मुंबई : राज्याच्या ३२ जिल्हयातील १०६ नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने चांगलीच मुसंडी मारली. काँग्रेसलाही चांगल यश मिळालं आहे. मात्र मुख्यमंत्री पद भूषवणारी  शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेलीय.  मुख्यमंत्री पद, नगरविकास ही महत्वाची खाती शिवसेनेकडे असतानाही छोटया शहरांमध्ये शिवसेनेला अपेक्षित यश मिळवता आलेले नाही.  

भाजपने ३८४ जागा जिंकून  पहिला क्रमांक कायम राखलाय. शहरी निमशहरी तसेच ग्रामीण भागामध्ये भाजपने यश मिळवले.  विधानसभा निवडणुकीनंतर सहा जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका व आता नगरपंचायत निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ३४४ जागा जिंकून दुस़या क्रमांकाचे यश संपादन केलं आहे राष्ट्रवादीने काँग्रेसला मागे टाकले आहे काँग्रेस तिस-या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे विदर्भात काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत त्यामुळे काँग्रेसने विदर्भात चांगले यश पटकावलं आहे  

शिवसेनेला २८४ जागा मिळाल्या आहेत यापैकी ८० जागा कोकणातील आहेत शिवसेनेचे कोकणातील वर्चस्व कायम राखले असले तरी राणे विरूध्द शिवसेना अशी रस्सीखेच  पाहायला मिळाली. रायगड जिल्हयातील खालापूर माणगाव पोलादपूर ठाणे जिल्हयातील शहापूर तर पालघर येथील मोखाडा नगरपंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकला गेल्याने पक्षाला मोठा फटका सहन करावा लागल्याचे चित्र दिसून येत आहे 

नगरपंचायतीमधील एकूण जागा १६४९

भाजप- ३८४
राष्ट्रवादी- ३४४
काँग्रेस- ३१६
शिवसेना- २८४
मनसे- ४
 अपक्ष- २०६
बसपा- ४
माकप- ११

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!