माथेरानमधील पार्किंगची समस्या अखेर मार्गी  !

कर्जत  ( राहुल देशमुख) : माथेरानला आल्यावर दस्तुरी नाक्यावर असलेल्या वनविभागाच्या अखत्यारीखालील पार्किंगच्या जागेवर सुयोग्य वाहनतळाची सोय नसल्याने ऐन सुट्ट्यांच्या हंगामात किंमती गाड्या कुठेही जंगलात पार्क कराव्या लागत होत्या.यासाठी येथील सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने गटनेते प्रसाद सावंत यांच्या पुढाकाराने ही महत्वपूर्ण समस्या मार्गी लागल्यानंतर सध्यातरी दस्तुरी नाक्यावरच्या वाहनतळावर जवळपास तीनशेहुन अधिक गाड्या सूयोग्यप्रकारे पार्क केल्या जात आहेत.
अनेक वर्षांपासून या पार्किंग समस्येमुळे पर्यटक इकडे येण्यास धजावत नव्हते.सुट्ट्यांच्या हंगामात घाट रस्त्यात गाड्या लावून पर्यटकांना माथेरान गावापर्यँत साधारणत: पाच किलोमीटरची पायपीट करावी लागत होती.घाटात गाड्यांचा ताफा वाढत गेल्याने ट्राफ़िक जाम होत होती.सध्यातरी पार्किंगची योग्य सुविधा केल्यामुळे दिवाळी हंगाम सुरू असल्याने गाड्या सुस्थितीत पार्क केल्या जात आहेत.त्यामुळे पर्यटकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.यासाठी वनखात्याचे अधिकारी वर्ग ,मुख्याधिकारी डॉ.सागर घोलप ,पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर ,लोकप्रतिनिधी यांनी विशेष सहकार्य केले.
—————————————————–
दस्तुरी येथील रिक्त असलेला एम.पी.९३ हा भूखंड पार्किंगसाठी नगरपालिकेकडे हस्तांतरित होण्यासाठी वनखात्याकडे सर्वसमावेशक कागदपत्रांसहित पाठविण्यात आले आहेत. सदर जागेचे सुशोभिकरण करून आणखी गाड्या येथे पार्क करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. काही दिवसात पार्किंगचा प्रश्न मार्गी लागेल. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढून इथला पर्यटन व्यवसाय आपोआपच बहरणार आहे . (  प्रसाद सावंत -गटनेते तथा नगरसेवक माथेरान नगरपालिका)
——————————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *