डोंबिवली : धावत्या लोकलमधून चढण्याचा अथवा उतरण्याचा प्रयत्न करू नका असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून सातत्याने केले जात असतानाही प्रवाशांकडून या आवाहनाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे त्यामुळे त्यामुळे हा प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतत आहे. असाच प्रसंग शनिवारी सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकावर घडला. धावती लोकल पकडताना लोकल खाली जाणा-या एका महिलेचे महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाच्या प्रसंगावधानामुळे प्राण वाचल्याची धक्कादायक घटना घडली. हा थरार प्रसंग CCTV कैद झालाय.

डोंबिवली रेल्वे स्थानकाहून सकाळी एक महिला मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल पडत होती इतक्या लोकल सुरू झाल्याने लोकल पकडण्यासाठी तिने धाव घेतली त्याच वेळी लोकल पकडण्याच्या प्रयत्नात असतानाच त्या महिलेचा तोल गेल्याने ती प्लॅटफॉर्म आणि लेाकलच्या गॅपमध्ये पडली. मात्र याचवेळी रेल्वे स्थानकावर कार्यरत असलेले एमएमसएफच्या जवान विवेक पाटील व किरण राऊत यांचे त्या महिलेकडे लक्ष गेले. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या महिलेच्या दिशेने धाव घेऊन तिचा जीव वाचवला. जवानांनी दाखवलेल्या धैर्याचे सर्वत्रच कौतूक आहेत आहे मात्र प्रवाशांनीही रेल्वेचे आवाहन गांभिर्याने पाळण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *