मुंबई : करोनाचा कहर, बाजारपेठेतील अस्थिरता यातून बळीराजा कसा बसा सावरत असताना पून्हा एकदा अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा संकटात सापडलाय. अवकाळी पावसामुळे पीकांचे प्रचंड नुकसान झाले असून हजारो शेळया मेंढयाचा मृत्यू झालाय. काळया मातीत काबाडकष्ट करणा-या बळीराजाची संकट संपता संपेना अशी स्थिती आहे यातून शेतकरी कसा सावरणार असाच प्रश्न उपस्थित हेात असून सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.


राज्यात पून्हा एकदा अवकाळीचे संकट उभं ठाकलंय गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात बदलेल्या हवामानाचा फटका बळीराजाला बसलाय वादळी वा-यासह आलेला पाऊस आणि कडाक्याची थंडी यामुळे ऊस, द्राक्ष कांदयासह अनेक पीकं हातची गेली आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सलग दोन दिवस पाऊस पडतो, यामुळे जनजीवन विस्कळीत झालय या बरोबरच शेतीचं मोठं नुकसान झालय याचा सर्वाधिक फटका ऊस पीकाला बसलाय. ऊस पीकाला तळयाचं स्वरूप आलयं, त्यामुळे ऊस उत्पादकांचे आर्थिक गणित बिघडय. यंदाच्या ऊस हंगामात ऊस उत्पादन जास्त झालय मात्र ऐन हिवाळयात आलेल्या पावसामुळे ऊसाला प्रचंड फटका बसला आहे. तसेच कांदा, हरभरा या पीकांचे मोंठे नुकसान झालय,

नाशिक, सांगली, पंढरपूर, बारामती या ठिकाणी अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागायतदार शेतक-यांच मोठं नुकसान झालयं. द्रांक्षांच्या घडात पाणी साचलय. त्यामुळे फवारणी करता येणार नाही त्यामुळे द्राक्ष बागायतदारांची हजारो हेक्टरवरील द्राक्ष बागा संकटात सापडल्या आहेत राज्यातील शेतक-यांचे कोटयावधी रूपयांचे नुकसान होणार आहे. वादळी पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

कांद्याने डोळयात पाणी
रोजच्या जीवनाला चव देणारा कांदा अवकाळी पावसामुळे कांद्याचे पीक वाया जाणार आहे . अवकाळी पावसाचा फटका कांदा उत्पादकांना बसला आहे. यंदा कांद्याला सुगीचे दिवस येतील या भावनेतून शेतक-याने कांद्याची लागवड अधिक प्रमाणात केली हेाती. मात्र रोगराईमुळे कांद्याचे मोठं नुकसान होणार असल्याने कांदा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शेतक-यांच्या डोळयात पाणी आलय.

मेंढपाळ हवालदील
अवकाळी पाऊस आणि थंडीचा फटका पीकांबरोबरच जनावरांना बसतोय, पुणे जिल्हयात एक हजाराहून अधिक मेंढया मृत्यूमुख पडल्यात त्यामुळे मेंढपाळ हवालदील झालेत. राज्य सरकारने आर्थिक मदत करावी अशी विनंती शेतकरी राजाकडून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!