कर्जत रेल्वे स्थानकात त्रुटी : दिल्ली बोर्डाने काढली खरडपट्टी 

रेल्वे प्रवासी सुरक्षा समिती दिल्ली बोर्डाच्या अधिकार्याँचे कर्जत रेल्वे स्थानकाला भेट !
कर्जत. (राहुल देशमुख) : भारतीय रेल्वे प्रवासी सुरक्षा समिति- दिल्ली चे सदस्य मा.श्री .अहमद इरफान अहमद यांनी आज त्यांच्या शिष्टमंडळासहित कर्जत रेल्वे स्थानकाला भेट देवून संपूर्ण स्थानकाची पाहणी केली.यांत कर्जत स्थानकावर अनेक त्रुटी आढळून आल्याने त्यांनी सर्व अधिकार्याँचि खरडपट्टी काढली.
आज सकाळी दिल्ली रिकुरर्मेन्ट बोर्डाचे व रेल्वे प्रवासी सुरक्षा समिति सदस्य अहमद इरफान यांनी कर्जत रेल्वे स्थानकाची पाहणी केली.त्यात प्रवाश्यांना पाणी पिण्यासाठी असलेले नळ व्यवस्थित नसल्याचे त्यानी सांगितले , रेल्वे स्थानकाबाहेर अस्ताव्यस्त व बेकायदेशीर पार्किंग केलेल्या दोन चाकी वाहनांना त्यानी साखळी लावण्यास सांगून दंड वसूल करण्यास सांगितले , रेल्वे परिसरातील फलकांची मुदत निघून गेली आहे , ते काढण्यास सांगितले , व्ही.के.जैन, दिवाडकर , दिलीपकुमार पन्नालाल , या बटाटे वडे विकना-या ठेकेदाराची वडे बनविण्याची जागा बघून त्यांनी कागदपत्रे तपासली , बटाटे सडलेले आहेत , मशीन व्यवस्थित नाही , बेसन बंदिस्त ठेवत नसल्याने उंदीर -घुस यांचे ते खाद्य असल्याने नागरिकांचे आरौग्यास धोका असल्याचे त्यांनी सांगितले व ठेकेदारावर कारवाई करण्यास सांगितले , प्रवासी जेथे बसतात तेथे पंखे बसविण्यासाठी सांगितले , वाय.एस.दिवाडकर अँड सन् यांची कर्जत स्थानकावर फलाट क्रमांक एकवर असणारी कैन्टिन आठ मीटर वाढीव आहे , हे कागदपत्रे बघून त्यांनी दिवाडकर या ठेकेदारावर दन्डात्मक कारवाई करण्यास सांगून उर्वरित जागा तोडण्यासाठी सांगितले , पेपर स्टॉल्स्ची टपरी जी बंद आहे , ती हटविन्यास सांगितले , मोठे पंखे, लहान पंखे प्रवासी बसतात तेथेच लावण्यासाठी सांगितले , दिवाडकर यांचे वडे बनवितात ते ठिकाण उघडे गटार , व घानीचे असल्याने कारवाई करण्यास सांगून स्थानकापासून बनविण्यात आलेले गेट बंद करण्यास सांगितले , रेल्वे स्थानकावर वडे तळण्यास मनाई असल्याने गॅस सिलेन्डरमुळे जीवितहानि होऊ शकते म्हणून वडे तळल्यास कारवाई करण्यास स्टेशन मास्टर्स यांना सांगितले , भिसेगाव बाजूची तिकीट खिडकी प्रवाश्यांच्या सोईसाठी चालू ठेवण्याच्या सूचना केल्या , ई.एम.यू.स्थानकावर शेड बांधण्याची सूचना केली , बंद पडलेल्या टप-या हटविन्यास सांगितल्या , फुटलेला रस्ता व्यवस्थित करण्यास सांगितले , कर्जत स्थानका लगत जागा कर्जत रेल्वेची असल्याने जुना नकाशा बघून असलेली दुकाने व तुलसी विहार ह्या इमारतीवर कारवाई करण्यास सांगितले , कैन्टिन धारकान्नी जेव्हढे वेन्डर मंजूर आहेत तेव्हढेच ठेवावेत अन्यथा कैन्टिन ठेकेदारावर कारवाई करण्यास सांगितले , व जेवढी कामे करण्यास सांगितली आहेत , ती झाल्यावर , कारवाई झाल्यावर , टप-या हटविल्यावर , कैन्टिन्ग ठेकेदारान्ववरील कारवाईचा संपुर्ण तपशील माझ्याकडे पाठविण्याचे आदेश स्टेशन मास्टर , आर.पी.एफ.चे निरीक्षक विश्वनाथ सिंग व संबंधित अधिकार्यांना दिले.
यावेळी अहमद इरफान यांच्या शिष्टमंडळा समवेत आर.पीएफ.चे निरीक्षक विश्वनाथ सिंग , तिकीट तपासनीस , जी.आर.पी.चे अधिकारी , भाजपा किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनील गोगटे , कर्जत ता.भाजपा अध्यक्ष दिपक बेहरे , माजी नगरसेवक नितीन परमार , शिवसेना नगरसेवक मुकेश पाटील , प्रभाकर करंजकर , आर.पी.आय.महिला कर्जत शहर अध्यक्षा वैशाली भोसले , रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्याध्यक्ष-शहा , रेल्वे रिक्षा युनियनचे सदस्य , त्याचप्रमाणे अनेक प्रवासी , नागरिक उपस्थित होते.यावेळी अनेकांनी समस्यांचे निवेदन श्री.अहमद यांच्याकडे दिले.यावेळी अहमद यांनी सर्व समस्या सोडविल्या जातील , असे आश्वासन दिले.रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाश्यासाठी एटीएम मशीन , अँम्बुलन्स , रेल्वे अपघात झालेल्या नागरिकाँसाठी अत्यावश्यक , सुसज्ज अॅन्बुलन्स आदी सेवा प्रवाश्याँना मिळणे , गरजेचे असल्याचे अनेकांनी तक्रारी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *