डोंबिवली : पूर्वेतील पाथर्ली स्मशानभूमीतील शवदाहिनीमधील गॅसचा भडका होऊन स्मशानभूमीतील कर्मचारी जखमी झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. गोपाळ अडसूळ असे त्या जखमी कर्मचायाचे नाव आहे. त्यांचा चेहरा गंभीररित्या भाजला असून, त्याच्यावर कळवा रूग्णालयात उपचार सुरू आहे.

पाथर्ली स्मशानभूमीत एका वृ्द्ध महिलेचा मृतदेह अत्यंसंस्कारासाठी आणण्यात आला होता, कंत्राटी कर्मचारी गोपाळ अडसूळ हे डयुटीवर होते. त्यांनी नेहमीप्रमाणे अंत्यंसंस्कारासाठी हा मृतदेह गॅस शवदाहिनीमध्ये टाकला मात्र त्यानंतर अचानक शववाहिनीतील गॅसचा भडका उडाला. या आगीच्या भडक्यामुळे अडसूळ त्यांचा चेहरा भाजला. अचानक घडलेल्या घटनेनंतर अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. अडसूळ हे भाजल्याने उपस्थितांनी तातडीने रूग्णवाहिका व पोलीसांच्या नंबरवर फोन केले, मात्र त्यांना कळवूनही तब्बल पाऊणतास ते आले नाही. त्यानंतर जखमी कर्मचा़याला पालिकेच्या शास्त्रीनगर रूग्णालयात नेण्यात आले. मात्र त्या ठिकाणी उपचारासाठी डॉक्टरच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दीड तासानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहचले, त्यांनी त्या कर्मचा़याला कळवा रूग्णालयात दाखल केले. या प्रकारानंतर पालिकेचा गलथान कारभार चव्हाटयावर आला असून, नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मात्र शवदाहिनीतील गॅसचा भडका कसा झाला याचा तपास सुरू आहे.

कोरोना काळात शवदाहिनीवर ताण

महानगर पालिका क्षेत्रात एकूण १२ स्मशानभूमी आहेत. कोरोनाने मृत रूग्णांना शवदाहिनीत अंत्यसंस्कार केले जायचे. कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने दररोज ८ ते ९ अंत्यसंस्कार होत असत. त्यामुळे शवदाहिनीवर लोड आल्यानंतर अनेकवेळा तांत्रिक बिघाड होऊन बंद पडण्याचे प्रकार घडले होते, त्यावेळी पालिकेकडून तातडीने दुरूस्ती केली जायची. मात्र आता अचानक गॅसचा भडका उडाल्याने कर्मचारी भयभित झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!