ठाणे, दि. 20 – कचरामुक्त शहर आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणाऱ्या देशभरातील महापालिकांना दिल्या जाणाऱ्या मानांकनामध्ये ठाणे महापालिकेला ‘थ्री स्टार’ नामांकन जाहीर झाले आहे. या निमित्ताने आयुक्त विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने कचरा व्यवस्थापनात केलेल्या कार्यावर सन्मानाची मोहर उमटली आहे.
आज केंद्रीय नगरविकास आणि शहर कामकाज विभागाचे सचिव दुर्गाशंकर मिश्र यांच्या हस्ते आज हा सन्मान ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांनी नवी दिल्ली येथे स्विकारला.
ठाणे शहरातील सोसायट्यांमध्ये कचऱ्याबाबत जनजागृती, ओला कचरा सुका कचरा.वर्गीकरण, कचरा वेचकांची नियुक्ती, ई वेस्टचे योग्य नियोजन, निर्माल्य पासून खत निर्मिती, हिरव्या कचऱ्यापासून ब्रिकेट तयार करणे, कचरा कुंडी मुक्त शहर आदी पर्यावरण पुरक योजनांमुळे ठाणे महापालिका थ्री स्टार मानांकनापर्यंत पोहचली आहे.
भारत सरकारने देशभरातील महापालिकांंचचे विविध निकषांवर सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये ठाणे महापालिकेने बाजी मारली आहे. घनकचरा व्यवस्थापन बाबत ठाणे महापालिका करीत असल्याने विविध उपाययोजनांमुळे ठाणे महापालिका हे सर्व निकष पुर्ण केले आहेत.