ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी कृषी कायदे मागे घेतल्यांनतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून अमेरिकन गायिका रिहानाचे धन्यवाद मानले आहे. शेती कायदे मागे घेतले जाण्यात तिचा खारीचा वाटा असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी एक वर्षापासून एक वर्षापासून दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन करत होते. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत होता. अमेरिकन गायिका रिहानाने देखील ट्वीट करत शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला होता. तीने शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात एक बातमी शेअर केली होती. यासोबत रिहानाने लिहिले होते, “लोक याविषयी का बोलत नाहीत?” रिहानाच्या या ट्विटमुळे बराच वाद झाला होता. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्वीट करीत रिहानाचे आभार मानले आहेत. तिच्याच ट्विटमुळे साऱ्या जगाचं लक्ष शेतकरी आंदोलनाकडे गेलं आणि सरकारची नाचक्की झाली होती,” असे आव्हाड म्हणाले आहेत.