राज ठाकरेंविषयी वेडेवाकडं बोलाल तर याद राखा : मनसेचा इशारा
डोंबिवलीतल्या संस्थांनाही केले आवाहन
डोंबिवली : भाजपचे खासदार डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविषयी अनुदगार काढल्यानंतर मनसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. यापुर्वीही रोटरीच्या कार्यक्रमात लालू प्रसाद यादव यांनी अनुदगार काढले होते. स्वामी आणि लालू सारख्या बेडगी व मराठी माणसांचा द्वेष करणारे अपमान करणारे पाहुणे हवेतच कश्याला? येवढा तरी मराठीचा अभिमान बाळगा असा संतप्त सवाल कदम यांनी डोंबिवलीतल्या संस्थांना केलाय. यापुढे राज ठाकरेंविषयी वेडेवाकडं बोलाल तर याद राखा असा इशाराच मनसेने दिलाय.
राज ठाकरे व युपीच्या लोकांचा डीएनए एकच असल्याचे वादग्रस्त वक्तव्य खासदार डॉ सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी डोंबिवलीच्या कार्यक्रमात केल्यानंतर मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यक्रमस्थळी धाव घेऊन स्वामींना जाब विचारला होता. मराठी माणसाचा अपमान कराल तर याद राखा असा दमही कदम यांनी स्वामींना भरला. यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते. कदम यांचा रौद्ररूप पाहिल्यानंतर त्यांनीही कदम यांची समजूत काढीत विषय संयमाने हाताळला. स्वामींच्या भोवती अंगरक्षकांचा घोळका असतानाही त्या घोळक्यातून शिरून कदम एकटेच स्वामींना जाब विचारीत होते. रोटरीच्या एका कार्यक्रमात यापूर्वी लालूप्रसाद यादव यांनी राज ठाकरेंविषयी अनुद्गगार काढले होते. मात्र त्यावेळी लालूप्रसाद यादव यांना काढता पाय घ्यावा लागला होता. महाराष्ट्रात व मराठी असलेले व महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या असंख्य प्रमुख वक्त्यांची येथे कमी नाही, स्वामी आणि लालू सारख्या बेडगी व मराठी माणसांचा द्वेष करणारे अपमान करणारे पाहुणे हवेतच कश्याला ? येवढा तरी मराठीचा अभिमान बाळगा. असा सवाल कदम यांनी डोंबिवलीतल्या संस्थांना केला आहे. राज ठाकरे जे करतात ते मराठी अस्मितेसाठीच करत आहेत भले आम्हाला तुमचे मतदान नका करू पण मराठी माणसाचा अपमान सुध्दा सहन नका करू असे आवाहन कदम यांनी केलय.
सुब्रमण्यम स्वामींना असा विचारला जाब