ठाणे : पालिका निवडणुकीत शिवसेनेने ५०० चौरस फुटांच्या घरांना करमाफी देण्याचे आश्वासन दिले होते तब्बल साडेचार वर्षानंतर या वचनाला शिवसेना जागली. गुरूवारच्या महासभेत ५०० चौरस फुटाच्या घरांना करमाफी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला, आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने वचनपूर्ती केली असली तरी कोरोनात पालिकेची आर्थिक स्थितीचा विचार करता हा ठराव कितपत तग धरेल हेच पाहावे लागणार आहे.
मुंबई व ठाणे महापालिका निवडणुकीच्या आधी शिवसेनेच्या वतीने दोन्ही शहरांतील ५०० चौरस फुटाच्या घरांना कर माफी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ठाणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेने हे वचन दिले होते. परंतु साडेचार वर्षानंतर सत्ताधा-यांनी हे वचनपूर्ती केलीय या बातमीने ठाणेकरांना दिलासा मिळाला आहे मात्र करमाफीचा परिणाम पालिकेच्या तिजेारीवर पडणार असून पालिकेला काटयावधी रूपयांना मुकावे लागणार आहे.