पुणे : इतिहास लेखक व शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सोमवारी १५ नोव्हेंबर रेाजी पहाटेच्या सुमारास निधन झाले त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.
पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. साडे आठ वाजता त्यांचं पार्थिव त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात आलं.पर्वतीहून त्यांची अंत्ययात्रा निघाली होती. शेकडो लोकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलं. राज्य शासनाच्यावतीने विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी स्वर्गीय पुरंदरे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अपर्ण करून श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे खासदार गिरीष बापट,जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, सहपोलीस आयुक्त डॉ रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, सांस्कृतीक कार्य विभागावतीने सहायक संचालक सुनीता आसवले यांनीही स्वर्गीय पुरंदरे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अपर्ण करून श्रध्दांजली वाहिली. बाबासाहेब पुरंदरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठी गर्दी जमली हेाती. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगुल वाजवून आणि बंदुकीच्या तन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली.