ठाणे : गेली २ वर्षे कोविड महामारीमुळे सर्व जग ठप्प झाले होते. कोरोना हा निसर्गाने मानवाला दिलेला धडा आहे. त्यामुळेच कोविड काळात निसर्ग संवर्धनाचे महत्व सर्वसामान्यांना कळून चुकले आहे. या महामारीच्या निमित्ताने माणूस निसर्गाच्या अधिकच जवळ आला आहे. तरूण पिढीला निसर्गाची ओळख व्हावी या उद्देशाने येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीच्यावतीने पक्षी सप्ताह आणि बालदिनाचे ओचित्य साधून येऊर येथे महाविद्यालयीन विद्याथ्यांना येऊर येथे नेऊन निसर्गाची ओळख करून दिली

ठाण्यातील प्रसिद्ध शिक्षण संस्था “कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय” हे याच आठवड्यात सुरु करण्यात आले आहे. मुलांनी शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्वीप्रमाणेच महाविद्यालयामध्ये येऊन सुरु करण्यापूर्वी निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करावी या हेतूने संस्थाचालक सचिन मोरे यांनी विद्यार्थ्यांसाठी येऊर येथे निसर्ग ओळख कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीकडे मानस व्यक्त केला होता त्यानुसारच पक्षीं सप्ताह आणि बालदिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम पार पडला

मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिन व (स्व.) डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त दि. ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत शासन स्तरावर दरवर्षी ‘पक्षी सप्ताह’ साजरा केला जातो तसेच दिनांक १४ नोव्हेंबर रोजी बाल दिन साजरा केला जातो. त्या अनुषंगाने मानपाडा गेट येथून येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीतर्फे रविवार १४ नोव्हेंबर २०२१ रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, वन विभाग यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी निसर्ग ओळख कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी ७-१० या दरम्यान ठाण्यातील सुप्रसिद्ध जंगलहाईक टूर्स च्या निसर्ग तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कोविड नियमांचे पालन करून या विद्यार्थ्यांना येऊर येथील जैवविविधतेचे ज्ञान करून दिले गेले. यामध्ये वृक्ष , सरीसृप, कीटक, फुलपाखरे, पक्षी, प्राणी यांची ओळख करून दिली गेली.

जंगलहाईक तर्फे प्राध्यापिका क्लारा कोरिया, अजित जोशी, संजय प्रभुघाटे, आनंद जुवेकर, प्रकाश गोरे, गणेश सरते, सुहास परांजपे, मंदार कदम, वनिशा फर्नांडिस या तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना निसर्ग ओळख करून दिली. तसेच वन विभागातर्फे वन परिक्षेत्र अधीकारी गणेश सोनटक्के व विकास कदम यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातर्फे गावडे, सोनजे व इतर प्राध्यापक वर्ग हजर होते.


संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबईच्या एक चतुर्थांश भागात व्यापले आहे. यातील अर्ध्याहून अधिक भूभाग हा ठाण्यातील येऊर परिसक्षेत्रात मोडतो. येऊर येथील जनलमध्ये १ हजारहून जास्त वनस्पतीच्या प्रजाती , ५० हजार जातीचे कीटक, १५० जातीची फुलपाखरे, २७४ जातींचे स्थानिक व स्थलांतरित पक्षी, ४० प्रकारचे सस्तन प्राणी वास्तव्य करतात. बिबट्यांचा वावर असलेले जगातील एकमेव शहरी जंगल अशी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची ख्याती आहे.

वातावरण बदलाशी सामना करायचा असेल तर तरुणांनी निसर्गभान जपणे महत्वाचे आहे त्याकरिता प्रथमतः त्यांना निसर्गज्ञान असणे गरजेचे आहे. भावी पिढीला निसर्ग वाचायला शिकविला तरच ते निसर्ग वाचवायला शिकतील.
रोहित जोशी – येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी

येऊर म्हणजे पार्ट्या करण्याचे ठिकाण अशी ओळख पुसून विद्यार्थ्यांसाठी, निसर्ग निरीक्षकांसाठीचे अभ्यासकेंद्र अशी नवी ओळख निर्माण व्हावी यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे. याकरिता येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटी सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रयत्नांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल
गणेश सोनटक्के – येऊर वन परिक्षेत्र अधिकारी

One thought on “असाही बालदिन साजरा : तरूण पिढीला येऊरमध्ये करून दिली निसर्गाची ओळख !”
  1. With honestly so much get information about trees,birds and insects etc. And that information so helpfully and that information we whated to spread in your environment about bird and tree and insect .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *