डोंबिवली : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे त्यातच वाढत्या महागाईने कळस गाठला आहे. त्यामुळे यंदा दिवाळी फराळावरही महागाईचे सावट पसरलं आहे, महागाईच्या काळात डोंबिवलीतील म्हात्रे कुटूंबियांकडून गोरगरीबांची दिवाळी गोड करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. अवघ्या एक रूपयात रवा, मैदा आणि साखर वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे गोरगरीबांना दिलासा मिळणार आहे.

डोंबिवली पश्चिमेतील शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक वामन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका कविता म्हात्रे, समाजसेवक गोरखनाथ ( बाळा ) म्हात्रे, युवा सेना उपशहर अधिकारी अनमोल म्हात्रे यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रं ५१ व प्रभाग क्रं. ५२ मध्ये दिवाळीसाठी गोरगरीबांना एक रूपयात रवा, साखर आणि मैदा उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच जेष्ठ नागरिकांची आधार असलेली काठी दिली जाणार आहे. हा उपक्रम गुरूवार २८ ऑक्टोबर २०२१ रेाजी गोपीनाथ चौक येथे दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या उपक्रमामुळे महागाईच्या काळात गोरगरीबांना दिलासा मिळणार आहे. कोरोना काळात म्हात्रे कुटूंबियांकडून ऑक्सीमीटर, टेम्परेचर मास्कचे प्रत्येक सोसायटीत मोफत वाटप करण्यात आले. तसेच लॉकडाऊन काळात भाज्या महागल्यानंतर एक रूपया दराने भाजी विक्री केली. यावेळी महिलांची मोठया प्रमाणात झुंबड उडाली होती. त्यामुळे एक रूपयात गोरगरीबांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *