मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनाची सौम्य लक्षण आहेत. राज ठाकरे यांना लीलावती रूग्णालयात मोनोक्लोनल अँटीबॅाडी हे उपचार केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आलय. राज ठाकरे यांच्या आईचा रिपोर्टही पॉझिटीव्ह आल्याचे समजते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फोनवरून राज ठाकरे यांच्या तब्बेतीची चौकशी केलीय.
राज ठाकरे यांना अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात विनामास्क वावरताना दिसले आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुणे नाशिक दौरे केले पदाधिकारी कार्यकत्यांशी भेटी घेतल्या हेात्या, मुख्यमंत्रयाचया सर्वपक्षीय बैठकीच्यावेळीही राज ठाकरे मास्क परिधान केला नव्हता. बाळासाहेबांच्या पुतळयाच्या अनावरण कार्यक्रम असो वा मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम अथवा दौरे.. राज ठाकरे हे नेहमीच विनामास्क वावरताना दिसून आले. केवळ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या भेटीच्यावेळी राज ठाकरे यांनी मास्क परिधान केला होता.
राज ठाकरेंना मास्क न परिधान करण्याविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी मी मास्क घालतच नाही, तुम्हालाही सांगतो असे म्हणाले होते. त्यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मास्क घालतच नाही म्हणा-यांना माझा नमस्कार..असे म्हणाले होते. मास्क हे एक कवच असून, कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याचे काम करते. त्यामुळे मास्क वापरण्याचे आवाहन राज्य सरकार आणि तज्ञांकडून केले जाते.