कल्याण : कल्याणच्या ऑर्केस्ट्रा बारमध्ये एका पेालीस कर्मचा-यासह सहा जणांनी धिंगाणा घातल्याचा प्रकार सोमवारी रात्रीच्या घडला याप्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केलीय. आज या सहा जणांना कल्याण रेल्वे कोर्टात हजर केले असता १ दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे.
टिटवाळा येथे राहणारा शेखर सरनोबत आपल्या काही मित्रांसोबत कल्याण पश्चिमेतील ताल बारमध्ये पार्टी करण्यासाठी आला होता. शेखरसोबत त्याचे पोलीस मित्र उत्तम घोडे, मंगल सिंग चौहान, रिकीन गज्जर, हरिश्याम सिंह, विक्रांत बेलेकर होते. घोडे हा पोलीस कर्मचारी टिटवाळा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. रात्री बारमध्ये गाणे सुरु होते. मद्यधुंद अवस्थेत या सहा लोकांनी अजून गाणे सुरू ठेवावा अशी मागणी बार मॅनेजरकडे केली. यावेळी बार मॅनेजरने बार बंद करण्याची वेळ झाली असून, तुम्ही बिल भरा आणि निघून जा. असे सांगितले. मात्र या सहा जणांनी बार मध्ये धिंगाणा सुरू केला.
गाणे सुरू करणार नाही तर आम्ही बिल भरणार नाही असे धमकावत हरीश्याम सिंग यांनी आपली लायसन्स रिव्हॉल्वर टेबलावर ठेवत बार मॅनेजरला धमकी देण्यास सुरुवात केली. बिल न भरता सर्व सहाजण बार बाहेर येऊन परत धिंगाणा सुरू केला. त्वरित याची माहिती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सहा जणांना अटक केलीय.