ठाणे : शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावरून वादंग निर्माण झाला असतानाच ठाण्यातील बॅनरने एकच खळबळ उडाली आहे. रामदास कदम यांचा फोटो असलेला एक बॅनर ठाण्यात झळकला असून कोकणचा ठाण्यावाघ असा उल्लेख करण्यात आला असून बॅनरवरील मजकूरावरून एकच खळबळ उडालीय.

ठाण्यातील नितीन कंपनी चौकात हा बॅनर लावण्यात आलाय. रामदास कदम यांचा फोटो असलेला एक बॅनर ठाण्यातील नितीन कंपनी चौकात लावण्यात आलाय. त्यावर शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो आहेत. मात्र, शिवसेनेचा उल्लेख नाहीत. इतकंच नाही तर या बॅनरवर एक मजकूरही लिहिण्यात आला आहे. यामुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद बॅनरबाजीच्या रूपाने चव्हाटयावर आलाय.

शिवसेनेचे नेते आणि विद्यमान मंत्री अनिल परब यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती रामदास कदम यांनीच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात कदम हे उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर आता रामदस कदम समर्थकांनी ठाण्यात केलेल्या बॅनरबाजीने खळबळ उडालीय.


काय आहे मजकूर …

कालपर्यंत राडा झाल्यावर आम्हाला फोन करणारे लोक आज आमचीच सुपारी द्यायला निघाले आहेत. त्यांना पुन्हा एकदा आठवण करुन देतो बाप बापच असतो… असा मजकूर या बॅनरवर पाहायला मिळत आहे. या बॅनरवर रामदास कदम यांचा मोठा फोटो लावण्यात आलाय. तर त्यांच्या फोटोमागे डरकाळी फोडणाऱ्या वाघाचं चित्रही काढण्यात आलं आहे. रामदास कदम यांच्या समर्थकांनी लावलेल्या बॅनरवरील मजकूर कुणाला उद्देशून आहे? कुणी कुणाची सुपारी दिली? अशी चर्चा आता ठाण्यात सुरु झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *