मुंबई : एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीचा मालकी हक्क आता टाटा सन्सकडे आला आहे टाटा समुहाने यासाठी सर्वाधिक १८ हजार कोटी रूपयांची बोली जिंकलीय एअर इंडिया ही पूर्वी टाटाच्या मालकीची होती. मात्र भारत स्वातंत्रय झाल्यानंतर सरकारने ही कंपनी ताब्यात घेतली होती. अखेर ६८ वर्षानंतर एअर इंडियाची मालकी पून्हा टाटा समुहाकडे आलीय.

एअर इंडियाची मालकी टाटा समुहाला मिळाल्यानंतर उद्योगपती रतन टाटा यांनी वेलकम बॅक एअर इंडिया अस ट्विट करीत आनंद व्यक्त केलाय टाटांनी जे आर डी टाटांचा फोटोही ट्विट केलाय एअर इंडियाची पुर्नबांधणी करण्यासाठी टाटा समूह ठोस प्रयत्न करेल. हवाई वाहतूक क्षेत्रात टाटा समूहासाठी यामुळे अनेक संधी उपलब्ध होतील.

जेआरडी टाटा यांच्या नेतृत्त्वात एअर इंडियाने नावलौकिक मिळवला होता. टाटा समूहाला पुन्हा एअर इंडियाला गतवैभव मिळवून देण्याची संधी आहे. आज आपल्यात जेआरडी असते तर त्यांना नक्कीच खूप आनंद झाला असता, अशा भावनाही टाटा यांनी ट्विटमधून व्यक्त केल्या.

टाटा समुहाकडून १८ हजार कोटीची बोली लावून एअर इंडिया खरेदी करण्यात आलीय त्यापैकी १५ हजार ३०० केाटींची रक्कम कर्ज फेडीसाठी वापरण्यात येणार असून उर्वरित रक्कम केंद्र सरकारला मिळणार आहे असे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहीन कांत यांनी स्पष्ट केलय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *