मुंबई : आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात झालीण् अश्विन शुद्ध प्रतिपदेला नवरात्रोत्सव सुरु होतो. नवरात्रोत्सवामध्ये रंगाचे महत्व असते. दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये नऊ वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. पाहूयात यावर्षीचे रंग कोणते आहेत.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. शैलपुत्री देवीला पिवळा रंग आवडतो. पिवळा रंग हा ज्ञान, विद्या, सुख, शांती, अध्ययन, विद्वता, योग्यता, एकाग्रता, मानसिक आणि बौद्धिक उन्नतीचे प्रतिक आहे. हा रंग मनामध्ये नवे विचार निर्माण करतो.
डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या संबंधित महिलांच्या भीशी ग्रुपने नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच्या पिवळ्या रंगाच्या निमित्ताने काढलेले फोटो