कल्याण : कल्याण डोंबिवलीत अवघ्या एक तासाच्या मुसळधार पावसामुळे कल्याणात छत्रपती शिवाजी महाराज चौकात, आबेडकर रोड परिसरात पाणी साचले. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती तर डोंबिवली स्टेशन परिसरात फडके रोड, आगरकर रोड गुडघाभर पाणी साचल्याने आजूबाजूच्या दुकानात पाणी शिरल्याने दुकानदारांची चागंलीच तारांबळ उडाली, जोरदार वाऱ्यामुळे कल्याण डोंबिवलीत काही ठिकाणी झाडें पडल्याच्या घटना घडल्या तर वीजांच्या कडकडाटामुळे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. तसेच एमआयडीसी मिलापनगर, वंदे मातरम् उद्यान जवळील सर्व्हिस रोडवर वादळी पावसाने रस्त्यावर झाड पडले.
अंबरनाथमध्ये दोघांचा दुदैवी मृत्यू
अंबरनाथ शहरात आज सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अंबरनाथ पूर्वेतील गॅस गोडाऊन परिसरात असलेल्या उद्यानाच्या संरक्षक भिंतीखालची माती खचली आणि भिंत बाजूलाच असलेल्या बैठ्या घरांवर ही संपूर्ण भिंत कोसळली. या घटनेत पाच ते सहा घरांचं मोठं नुकसान झालं. तसंच काही गाड्या देखील भिंतीखाली दबल्याने गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.