मुंबई : केंद्रीय अंमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रविवारी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या प्रकरणामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत आठ जणांना एनसीबीने अटक केली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्या क्रूझवरून ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत एनसीबी आणि भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना एनसीबीच्या कार्यालयात घेऊन जाणारे के पी गोसावी आणि मनिष भानुशाली हे भाजपाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप मलिक यांनी केल्याने खळबळ उडालीय.


‘मुंबईत एनसीबीने क्रूझवर कारवाई करून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर काहींना अटक केलेली आहे. मात्र आर्यन खानला अटक करताना ज्या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे, तो के. पी. गोसावी नावाचा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसल्याची बाब खुद्द एनसीबीने सांगितली आहे. तसेच अरबाज मर्चंटला अटक करणारा मनीष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असून तोही एनसीबीचा अधिकारी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मग या दोघांनी कोणत्या अधिकारात हायप्रोफाइल लोकांना अटक केली, याचे उत्तर एनसीबीने दिले पाहिजे’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी केली होती. क्रूझवर ड्रग्ज सापडलं तर मग फोटो एनसीबी कार्यालयात का काढले, असा सवालही मलिक यांनी विचारला.

आरोप बिनबुडाचे : एनसीबी

मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपानंतर एनसीबीने पत्रकार परिषद घेतली योवळी त्यानी गेल्या चार दिवसांत एनसीबीने केलेल्या कारवाईची माहिती सांगितली. सर्व कारवाई नियमांनुसार झाली असून आमच्यावर झालेले आरोप बिनबुडाचे आहेत असे एनसीबीने स्पष्ट केलय. २ ऑक्टोबरला एनसीबीने छापा मारला त्यावेळी ८ जणांना अटक केली त्यांकडून ड्रग्ज जप्त केलय. तसेच किरण गोसावी, मनीष भानुशाली यांनी कारवाईत मदत केली असल्याचे एनसीबीने सांगितलं.

कोण आहे मनिष भानुशाली …

मनिष भानुशाली हे डोंबिवली एमआयडीसी परिसरात राहतात, ते व्यावसायिक असून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहे. डोंबिवलीत राहत असले तरी दिल्लीतच अधिक काळ असतात. २०१२ पर्यंत मनिष भाजपचा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यानंतर त्याच्याकडे कोणतेही पद नसले तरी ते भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक लढवली हेाती. मनिष भानुशालींचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांशी थेट संबंध आहेत. फेसबुकवर त्याने उपलोड केलेल्या बड्या नेत्यांसोबतच्या फोटोंवरून या नेत्यांशी असलेली जवळीक दिसून येते.

किरण गोसावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *