मुंबई : राज्यातल्या धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, नागपूर, पालघर या ६ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणार्‍या ३८ पंचायत समित्यांचे आज निकाल जाहीर झाले. सहा जिल्हा परिषदांच्या ८५ जागांसाठी पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीने वर्चस्व मिळवले असले तरी भाजपला सर्वाधिक २३ जागा मिळाल्याने नंबर एकचा पक्ष ठरला आहे तर काँग्रेस राष्ट्रवादीला समसमान १७ जागा मिळाल्या आहेत मात्र राज्यात मुख्यमंत्री असलेल्या शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेलीय.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पोटनिवडणूक मंगळवारी पार पडली बुधवारी सकाळी दहा वाजल्यापासूनचमतमोजणीला सुरूवात झाली. जिल्हा परिषदेच्या ८५ जागांचे निकाल जाहिर झाले असून भाजपने दणदणीत विजय मिळवत राज्यात नंबर वन ठरला आहे . तर पंचायत समितीत काँग्रेसने बाजी मारली आहे, जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते तर काही ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी तर मनसे आणि भाजपचीही युती झाली होती.

जनतेनं सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला निवडून दिलं आहे भारतीय जनता पक्षाची स्पेस वाढत चाललीय अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. २२५ जागांपैकी ५५ जागा म्हणजे २५ टक्के जागा भाजपाला मिळाल्या आहेत. २५ टक्के जागा अपक्ष आणि इतरांना मिळाल्या आहेत. आणि तीन पक्ष एकत्र येऊनही उरलेल्या ५० टक्क्यात ते ३ पक्ष अडकले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्यात ज्यांची सत्ता आहे, दुर्दैवाने तो शिवसेना पक्ष चौथ्या क्रमांकाचा पक्ष झालाय. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भाजपावरच जनतेनं विश्वास दाखवला आहे”, असं फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोणत्या पक्षाला किती जागा

भाजप : २३
काँग्रेस :१७
राष्ट्रवादी : १७
शिवसेना : १२
इतर : १६

सहा जिल्हा परिषदांमधील निकाल

नागपूरमध्ये काँग्रेसचं वर्चस्व
एकूण जागा १६
काँग्रेस : ९
भाजप : ३
राष्ट्रवादी : २
इतर : २

अकोल्यात वंचितची बाजी
एकूण जागा १४
वंचित आघाडी : ६
भाजप : १
शिवसेना : १
राष्ट्रवादी : २
काँग्रेस : १
प्रहार : १
अपक्ष : २

धुळयात भाजपचे वर्चस्व
एकूण जागा : १५
भाजप : ८
राष्ट्रवादी : ३
शिवसेना : २
काँग्रेस : २

पालघरमध्ये भाजप शिवसेना समान
एकूण जागा : १५
भाजप : ५
शिवसेना : ५
राष्ट्रवादी ४
माकप : १

वाशिम काँग्रेसची आघाडी
एकूण जागा : १४
काँग्रेस : ४
राष्ट्रवादी : ३
भाजप : २
शिवसेना : १
इतर : ३
अपक्ष : १

नंदुरबारमध्ये भाजपची बाजी
एकूण जागा ११
भाजप : ४
काँग्रेस : ३
शिवसेना : ३ राष्ट्रवादी : १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!