मुंबई : आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. डोंबिवलीत दौ-यावर असलेले मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी खड्डयांच्या मुद्दयावरून शिवसेनेवर निशाणा साधला. अमित ठाकरेंच्या टीकेला आता मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलय. त्यामुळे खड्डयांवरून ठाकरे बंधू आमने सामने आल्याचे दिसून येत आहे.,
कल्याण डोंबिवलीत दौ-यावर आल्यानंतर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी शिवसेनेचे नाव घेता टीका केली. जोपर्यंत हे सत्तेत आहेत तो पर्यंत रस्ते सुधारणार नाही. मनसेने नाशिकमध्ये ५ वर्षात करून दाखवलं चांगले रस्ते केले मग हे २५ वर्षात का करू शकले नाही अशी टीका अमित ठाकरे यांनी केली होती.
अमित ठाकरेंच्या टीकेनंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही प्रत्युत्तर दिलय. “आपल्या सगळ्यांना मुंबईवर विश्वास आहे, बीएमसीवर विश्वास आहे. आपण जे काम करतो ते काही एका रात्रीत होणार नाही… ते काम आपल्याला दिसायला लागतं करावा लागतं” असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान युवासेना सचिव वरूण सरदेसाई हे शनिवारी कल्याणात आले होते त्यांनीही अमित ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलय. स्थानिक पातळीवर कोण काम करतंय हे नागरिकांना सर्व माहिती असल्याचे खरमरीत प्रत्युत्तर दिलय. त्यामुळे खड्डयांवरून शिवसेना व मनसेमध्ये जुंपली आहे.