कचरा व्यवस्थपनाचे काम न करणाऱ्या २०९ एएलएमची नोंदणी रद्द
मुंबई : कचरा व्यवस्थापनाचे काम न करणा-या २०९ प्रगत परिसर व्यवस्थापनांची (एएलएम) नोंदणी रद्द करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला असून, त्यांच्या जागी नवीन प्रगत परिसर व्यवस्थापन नेमण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलीय, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन खात्याचे उपायुक्त विजय बालमवार यांनी दिलीय.
ओल्या व सुक्या कच-याचे वर्गीकरण सोसायटी स्तरावर व्हावे तसेच ओल्या कच-यापासून खत निर्मिती होऊन, महापालिका क्षेत्रातील कच-याचे प्रमाण कमी व्हावे, या हेतूने नोव्हेंबर १९९७ पासून प्रगत परिसर व्यवस्थापन या उपक्रमाची सुरुवात झाली होती. मात्र अनेक ‘एएलएम’ कार्यरत नसल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्याने त्याची गंभीर दखल घेऊन अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांनी सर्वच एएलएमच्या कामांची तपासणी करण्याचे आदेश सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले होते, त्यानुसार ही कारवाई केलीय.
महापालिकेच्या सर्व २४ विभागात पूर्वी ७१९ ‘एएलएम’ नोंदणीकृत होते. आढावा घेतल्यानंतर प्रत्यक्षात ४५६ प्रगत परिसर व्यवस्थापन कार्यरत असल्याचे आढळून आले. यापैकी २६५ एएलएम घनकचरा क्षेत्रात कार्यरत आहेत. यात १४५ एएलएम चे काम समाधानकारक असून १२० एएलएमचे काम फारसे समाधानकारक नसल्याचे आढळले आहे. या १२० पैकी १८ एएलएमचे काम अजिबात समाधानकारक नसल्याने त्यांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. समाधानकारक काम करणा-या १४५ ‘एएलएम’पैकी सर्वात जास्त संख्या ‘एच पश्चिम’ या विभागात आहे. या विभागात ३८ एएलएम चांगले काम करीत असून ‘के पश्चिम १९,एम पश्चिम १२, आर दक्षिण ११, एफ दक्षिण १०’ अशी ही संख्या आहे. घनकचरा क्षेत्रात कार्यरत नसलेल्या एएलएमची संख्याही’एच पश्चिम’ मध्ये १२७ अशी सर्वात जास्त आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *