कल्याण : कल्याण डोंबिवली कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने करोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील विधवा महिला वारसांना दोन लाख रुपयांचे वाटप करण्यात आले, माजी महापौर, शिवसेनेचे नेते रमेश जाधव, लेखाधिकारी बागुल यांच्या हस्ते स्थायी समिती सभागृहात हे धनादेश देण्यात आले.


करोना काळात अनेक कर्मचा-र्यांनी जीवाची बाजी लावून करोनाशी लढा दिला, अनेक कर्मचारी खाजगी रुग्णालयात दाखल झाले, त्यांची कुटुंबे देखील बाधित झाली, तर काही मृत्यू मुखी पडली, शासनाने महापालेकेने खर्च उचलण्याची जबाबदारी घेतली, परंतु त्यांना कोणताही खर्च मिळाला नाही.तसेच कर्मचा-यांना कर्ज काढूनच रुग्णालयाचा खर्च करावा लागला, महापालिकेतून त्यांच्या वारसांना मिळणारी रक्कम पेन्शन, प्राविडंड फंड, तथा वारसांना नोकरी, अद्याप मिळालेली नाही. तसेव बिले मंजुरी करीता आरोग्य अधिका-यांकडून अनेक कारणे सांगून फाईली धुळ खात पडून आहेत, यावर पतसंस्थेच्या वतीने जे कर्मचारी संघटनेचे सभासद आहेत त्यांचा गृप विमा काढण्यात आला होता,३५०सदस्य संख्या असलेल्या सर्व सदस्यांचा विमा भविष्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन केल्याने आज पतसंस्थेने साळवे, जाधव परिवारास दोन लाख रुपयांचे धनादेश देऊ शकली आहे, तसेच मागील वर्षी १ लाख रूपये देण्यात आले हेाते. संस्थेचे अध्यक्ष पोळ, गायकवाड, मोरे, सरकटे , खरात, अनघा पवार, कांबळे, संचालक मंडळ अत्यंत प्रामाणिक पणे काम करीत आहेत.संस्थेचे भाग भांडवल अवघ्या १० वर्षात् १० हजारावरून ३ कोटीवर पोहचले आहे. संस्थेला अ वर्ग मिळत आलेला आहे. यावेळी बोलताना रमेश जाधव म्हणाले की, प्रशासनाने कर्मचारी वर्गाच्या प्रलंबित असलेल्या बर्याच समस्या मार्गी लावल्या आहेत. आरोग्या चा गृप विमा, व थकीत बिलाची रक्कम व मिळणारे फायदे तातडीने देण्याची दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *