कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेचा चक्की नाका ते नेवाळी दरम्यानच्या रस्त्याची आज मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका अधिकार्या समवेत पाहणी केली .यावेळी राजू पाटील यांनी अधिकाऱ्यांवर जाब विचारत १५ दिवसांचा अल्टीमेटम दिलाय .आता सहनशीलतेचा अंत झालाय १५ दिवसात खड्डे भरा अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात भरू असा इशारा आमदार राजू पाटील यांनी पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांना दिलाय.
महापालिकेने गेल्या आठ वर्षाचा तब्बल ११४ कोटी खड्डे भरण्यासाठी खर्च केले, मात्र अद्यापही या रस्त्यांची परिस्थिती जैसे थे आहे .यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने बारा कोटीच्या निविदा काढल्या होत्या यंदा पावसाळ्यातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे मात्र ही खड्डे भरण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. आज मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांसमवेत कल्याण डोंबिवली मधील रस्त्यांची पाहणी केली.
यावेळी बोलताना आमदार पाटील यांनी सत्ताधारी शिवसेना व पालिका प्रशासनावर टीका केली. रस्त्याची अवस्था खूपच खराब आहे. अनेक महिन्यांपासून रस्त्यांबाबत पाठपुरावा करत होतो मात्र प्रशासनाने लक्ष दिले नाही त्यामुळे आज दौरा काढला , या रस्त्याचे तर 95 टक्के बिलिंग झाले मात्र त्या प्रमाणात काम झालेला नाही, मुंबईत ब्लॅकलिस्ट केलेल्या ठेकेदाराला या रस्त्याचं काम दिलं. सत्ताधारी सिंहाचा नव्हे तर वाघाचा वाटा खातात त्यामुळेच या रस्त्यांची अशी अवस्था झाली अशी टीका केली.