मुंबई. २८ : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सुचनेनुसार बंगालच्या समुद्रात वादळसदृश्य (गुलाब चक्रीवादळ) स्थिती निर्माण होत असल्याने दिनांक १ ऑक्टोबर २०२१ पर्यत कोकण किनापट्टीलगतच्या जिल्हयातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आलय.
गुलाब चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरी त्याच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. पश्चिम विदर्भावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्याज आलाय . पालघर, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि जळगावसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. उद्या उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उद्यासाठी नाशिक, पालघर, ठाणे, रायगड, धुळे आणि नंदुरबारसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.