मुंबई : पालघरमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची पोटनिवडणूक होत असून या निवडणुत भाजप आणि मनसेच्या युतीची घोषणा झाल्यानंतर आता आगामी महापालिका निवडणुकांमध्ये पालघर पॅटर्न राबविण्याची मागणी कार्यकत्यांमध्ये सुरू झालीय. त्यामुळे मनसे भाजप युतीमुळे नवं राजकीय समिकरण पाहायला मिळणार आहे. भाजपशी युती झाली तर मनसेला संजीवनी मिळणार आहे तसेच शिवसेना वेगळी झाल्यानंतर भाजपला मनसेच्या माध्यमातून नवा मित्र मिळणार आहे. त्यामुळे दोघांसाठी युती फायद्याची ठरणार आहे. त्यामुळेच मनसे भाजप युतीचे नवं राजकीय समिकरण लवकरच पाहायला मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती त्यानंतर राज्यात मनसे भाजप युतीवर चर्चा सुरू झाली होती. पालघर जिल्हा परिषद पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. यासाठी वाडा तालुक्यात भाजप मनसे युतीची घोषणा करण्यात आलीय. पालघरमध्ये युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आता पुण्यात नाशिक, ठाणे आणि कल्याणात दोन्ही पक्षातील कार्यकत्यांकडून युतीची मागणी होत आहे.

नाशिकमध्ये मनसेची सत्ता होती, मनसेचे ४० नगरसेवक निवडून आले होते त्यामुळे नाशिकमध्ये मनसेचा प्रभाव आहे सध्या राज ठाकरे नाशिकात ठाण मांडून आहेत. त्यामुळे भाजप मनसे युती झाली तर नवीन ताकद उभी राहणार आहे.

केडीएमसीत तीन आमदारांची ताकद …
कल्याण डेांबिवली महापालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. कल्याण डेांबिवलीत मनसेचे राजू पाटील, भाजपचे रविंद्र चव्हाण, गणपत गायकवाड हे तीन आमदार आहेत त्यामुळे भाजप मनसे युती झाली तर मोठी ताकद उभी राहणार आहे. मुंबई ठाणे कल्याणमधून शिवसेनेला हद्दपार करण्याचा निर्धार भाजपने घेतला आहे त्यामुळे मनसेची किती साथ मिळते हेच पाहावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *