कल्याण : रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या नागरिकांना तब्बल १५ वर्षे होऊनही बीएसयूपी योजनेत घरे मिळालेली नाहीत त्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे आज बाधित नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केल दसऱ्यापर्यंत केडीएमसीकडून ताबा न मिळाल्यास संबंधित इमारतीत घुसून घरांचा ताबा घेण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिलाय.
पत्रीपुल ते दुर्गाडी रस्ता रुंदीकरणात अनेक नागरिकांची घरे तुटली. त्यापैकी केडीएमसीकडून ३२२ लाभार्थी निश्चित करून त्यांना बीएसयूपीत घरं देण्याचा निर्णय केडीएमसीकडून घेण्यात आला. मात्र १५ वर्षे उलटूनही हे बाधित नागरिकांना घराचा ताबा मिळाला नाही त्यासाठी नागरिक केडीएमसीचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र त्यानंतरही पदरी निराशाच येत असल्याने आज या नागरिकांनी साखळी उपोषणाचा मार्ग पत्करल्याचे शकील खान यांनी सांगितले. दरम्यान नागरिकांच्या या आंदोलनाला काँग्रेस आणि शिवसेनेनेही पाठींबा दिला असून त्यांनी केडीएमसीच्या ढिसाळ कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच दसऱ्यापर्यंत घरं मंजूर झालेल्या नागरिकांना केडीएमसीने ताबा दिला नाही तर संबंधित इमारतीत घुसून ताबा घेण्याचा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिलाय.