ठाणे दि.२६ सप्टेंबर :– ठाणे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने मिरा-भाईंदर शहरातील वर्सोवा नाका येथील जुन्या खाडी पूलाच्या दुरुस्तीचे काम पुढील तीन दिवस २८ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले असून वर्सोवा पुलावरून अवजड वाहनांना नियमीत वाहतूक करता येणार आहे.
वर्सोवा पुलाची दुरू्स्ती करण्यासाठी सदर पुलावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात येणार होती. मात्र सदर पुलाच्या दुरुस्तीचे काम संबंधीत विभागाकडून पुढे ढकलण्यात यावे याबाबत ठाणे शहर वाहतूक विभागाकडून कळविण्यात आल्याने सदर बाब विचारात घेवून आय. आर. बी. सुरत यांनी वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचे काम वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ८-१० दिवस पुढे ढकलण्यात येत असलेबाबत कळविले आहे. त्यामुळे दिनांक २६/०९/२०२१ ते दि. २८/०९/२०२१ या ३ दिवसांच्या कालावधीकरिता बर्सोवा पुलावरून अवजड वाहनांना बंद करण्यात आलेली वाहतूक बंदी दिनांक उठविण्यात आली आहे, असे मीरा भाईंदर पोलिस आयुक्तालयाकडून कळविण्यात आले आहे.