ठाणे : ठाण्यातील खड्डयांचा आँखो देखो परिस्थिती खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानंतर अधिका-यांवर चांगलेच संतापले. खड्डयांसाठी जबाबदार असणा-यांवर कारवाईचे करण्याचे आदेश पालकमंत्रयांनी दिल्यानंतर अखेर ठाणे महापालिकेच्या चार अभियंत्यांना निलंबीत करण्यात आले आहे चेतन पटेल प्रकाश खडतरे संदीप सावंत आणि संदीप गायकवाड अशी निलंबीत अधिका-यांची नावे आहेत
ठाण्यातील खड्डयांच्या समस्येने ठाणेकर त्रस्त झाले आहेत खड्डयांमुळे एका तरूणाला जीव गमवावा लागला होता खड्डांच्या समस्येवर मनसेने आवाज उठवून खड्डे प्रदर्शन भरवले. एकिकडे मनसेचे प्रदर्शन सुरू असतानाच दुसरीकडे पालकमंत्री शिंदे हे शुक्रवारी स्वत: रस्त्यावर उतरले त्यांनी ठाण्यातील रस्त्यांची पाहणी केली यावेळी पालिकेतील एमएमआरडीए तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी रस्त्यावरील खड्डे आणि त्यांच्या गुणवत्तेवरून शिंदे यांनी अधिका-यांची चांगलीच कानउघडणी केली. रस्त्याची गुणवत्ता राखा अधिकारी व कंत्राटदारावर कारवाई करा असे आदेश पालकमंत्री शिंदे यांनी पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांना दिले होते
पालकमंत्रयाच्या आदेशानंतर शनिवारी पालिका आयुक्तांनी पालिकेतील चार अभियंत्यावर शिस्तभंगाची आणि निलंबनाची कारवाई केली. खड्डे भरण्यावर तसेच कामाच्या गुणवत्तेबाबत दुर्लक्ष केल्याने चार अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
रस्त्याची कामे नीट करा अन्यथा कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करा ..