ठाणे : पोटातील आग, झोपायची चिंता असे बरेच काही अडचणी असणाऱ्या निराधारांना ,निराश्रित असणाऱ्या आपल्या बांधवांना किमान पोटाची तरी भुक भागविण्यासाठी समतोल फाऊंडेशनच्यावतीने अन्नदान करीत मदतीचा हात दिला आहे. समतोलच्यावतीने दररोज २०० गरजूंना अन्नदान वाटप केलं जातय.

गरजवंताला जेव्हा अन्न देऊन पोटातील आग शांत होते तेव्हा त्याचे मानसिक समाधान आपोआपच चेहऱ्यावर दिसते म्हणून अन्नदान हे सर्व श्रेष्ठ दान म्हटले आहे समतोल चे संस्थापक विजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली व एस.हरीहरण, संजयजी केळकर यांचे मार्गदर्शन घेऊन आमचे सेवेकरी राजेंद्र गोसावी, रूपेश जगे ,ओमकार कुलकर्णी ,रवींद्र जोशी ,अन्नपूर्णा  रिंकु यादव ,रंजना रजपूत भर पावसातही कोणी उपाशी पोटी झोपु नये म्हणून प्रयत्न करीत आहेत तसेच सिव्हिल हाँस्पीटल मधील डॉक्टरांपासुन ,पेशंट व नातेवाईक यांना अन्नदान होत आहे.  दैनंदिन 200 च्या आसपास गरजूंना मदत केली जाते अन्नाची गरज कोणाला नसते वेळेप्रसंगी व्यक्ती भुकेसाठी काहीही करायला तयार होतो त्यामुळे सर्व प्राणी, पक्षी यांना अन्नदान झाले पाहिजे  समतोल फांऊडेशन हे लहान मुलांना घेऊन काम करीतच आहेच व समतोल सेवा फांऊडेशन हे मोठ्या लोकांना घेऊन काम करीत आहे जीवनात परोपकार हीच खरी ईश्वर सेवा आहे. भगवान तो ये बंदे इन्सान में मिलेगा अशी भावना समतोल सेवा फऊंडेशनचे विजय जाधव व्यक्त करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *