डोंबिवली : १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहीक बलात्काराची घटना समोर आल्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं असून सत्ताधारी नेत्यांनीही संताप व्यक्त करत दोषींवर कडक शासन करण्याची मागणी केली आहे. मुंबईतील साकी नाका बलात्कार प्रकरणावरून राज्यांतील महिला सुरक्षेवरून अब्रूचे धिंडवडे निघत असतानाच आता डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणाने महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा शरमेने खाली गेली आहे.

आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश दिलेत : एकनाथ शिंदे
डोंबिवलीतील बलात्काराची घटना अतिशय निंदनीय असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना आरोपीवर कोठार कारवाईचे आदेश दिले आहेत. अशा प्रकारच्या घृणास्पद घटना घडू नये, यासाठी दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईल. असे पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले. याप्रकरणी छोट्या घटना घडल्या तरीही पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत.

राज्यात भयाचे वातावरण : देवेंद्र फडणवीस
डोंबिवलीतील घटना ऐकून मन सुन्न झाले महिला अत्याचाराची सातत्याने वाढणारी प्रकरणे चीड आणणारी आहेत. असा संताप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केलाय. राज्यात भयाचे वातावरण तयार झालयं, सातत्याने वाढत्या घटना चिंताजनक आहे. सरकारने गृहमंत्रालयाने आणि पोलीसाने विशेष लक्ष घालण्याची गरज आहे. डोंबिवली सारखा भाग जो साधारणपणे शांत भाग ओळखला जातो त्या ठिकाणी अशा प्रकारची घटना होणे हे धक्कादायक आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी फडणवीस यांनी केलीय.

आरोपींना ताब्यात द्या, आम्ही त्यांची धिंड काढू : विद्या चव्हाण
डोंबिवली बलात्कारातील आरोपींना आमच्या ताब्यात द्या. आम्ही त्यांची धिंड काढू अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी दिलीय. चव्हाण यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात भेट दिल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात आरोपी आमच्या ताब्यात द्या आशा घोषणा दिल्या.

आता तरी सरकार विशेष अधिवेशन घेईल ही अपेक्षा : सुधीर मुनगंटीवार
डोंबिवलीतील घटना ही थरकाप उडवणारी आणि मन सुन्न करणारी आहे. सरकार बलात्कारासारख्या गंभीर विषयावर चर्चा करत नाही. तुम्ही हजार वर्ष सत्तेत राहा, तुमची सत्ता सुरक्षीत ठेवा.पण महिलांची सुरक्षा राखा. गुन्हा करणाऱ्या लोकांच्या मनात धडकी भरली पाहिजे. पण यावर उपाययोजना करण्यापेक्षा मुख्यमंत्री राज्यपालांनी फॉरवर्ड केलेल्या निवेदनाला उत्तर देत आहेत. आता डोंबिवलीच्या घटनेनंतर तरी महिलांसाठी विशेष अधिवेशन सरकार घेईल अशी अपेक्षा आहे, अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

आता कोणाचं थोबाड फोडायचं : चित्रा वाघ
डोंबिवलीत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असून आणखी किती बलात्कार झाल्यानंतर सरकारला जाग येईल असा सवाल भाजपच्या महिल्या नेत्या चित्रा वाघ यांनी करत संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. रोज घटना होत असताना आता थोबाड कोणाचं फोडायचं विरोधकाचं की सरकारचं अशी खरमरीत टीका वाघ यांनी राऊत यांच्यावर केली.

उत्तरप्रदेश दिल्लीसारखी परिस्थिती : शालिनी ठाकरे
मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ही संताप व्यक्त केला आहे. डोंबिवलीमधील घटना अंगावर काटा आणणारी आहे. दिल्ली, उत्तरप्र देशपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी नाही हे सिद्ध होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अजून काय घडणे अपेक्षित आहे ? असा सवाल शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवर उपस्थित केला आहे.

https://www.citizenjournalist4.com/gang-rape-of-a-minor-girl-in-dombivli-10609/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!