लेह लदाख : लेह लडाखमधील जनरल रिजर्व इंजिनियर फोर्स (ग्रोफ, मिलिटरी आणि डिफेन्स) मुख्यालय 16 सीमा सडक कृतिक बलाच्या मराठी कर्मचारी, जवानांनी श्री गणेश उत्सव लेह लदाखमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला. श्री गणेशाची मूर्ती हवाई मार्गाने पुण्याहून लेहमध्ये गणेश चतुर्थीला आणण्यात आली होती.
१० सप्टेंबर रोजी श्री गणेशाची विधिवत स्थापना केली. १९ सप्टेंबर रोजी भंडारा आयोजित करण्यात आला आणि अनंत चतुर्दशीला लेहमधील सिंधु नदीपात्रात विधिवत गणेश मूर्ती विसर्जन केले. महाराष्ट्रातील गणेशोत्सवासारखाचा उत्साह लेह लदाखमध्येही मराठी सैनिक आणि सुरक्षा दलाच्या कर्मचा-यांनी दाखवला. लेह लदाखमधील बिआरओ, विभागीय कर्मचा-यांच्या श्री गणेश मित्र मंडळाचा यंदाचा हा ११ वा गणेशोत्सव सोहळा होता. या ठिकाणी जी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. ती मूर्ती आणि पुजेचे साहित्य, महाराष्ट्रातून हवाई मार्गाने लेहमध्ये पोहचवले जाते. गणेशोत्सव साजरा करणारे अमळनेर येथील सतीश पाटील, पंढपूर येथील बालाजी काळे, पुण्यातील प्रविण दाईंडगे, चाळीसगाव येथील संदीप पाटील, कोल्हापूरमधील लक्ष्मण तोडकर, अहमदनगरमधील अशोक किंकर, सतीश गुडदे, मस्के, विनोद पवार, संतोष पडांगळे, किशोर फडतरे, संजय काळे अशी या केंद्रिय सुरक्षा दल आणि विभागातील कर्मचा-यांची नावे आहेत.