मुंबई : महिला अत्याचाराच्या मुद्यावरून राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील पत्रसंघर्ष पाहावयास मिळाल्यानंतर आता विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरें यांना सल्ला दिलाय. ‘मुख्यमंत्री कार्यालयात काही अधिकारी अपरिपक्व आहेत. अशा प्रकारचे पत्र पाठवताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातरजमा केली पाहिजे’ अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राज्यपालांनी महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांना विनंती करुन संसदेचं चार दिवसीय विशेष सत्र बोलावण्याची मागणी केली आहे. त्यावर आता भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली जातेय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांनी अपरिपक्वतेचं दर्शन घडवल्याचा जोरदार टोला लगावलाय.

‘मुख्यमंत्री कार्यालयात काही अधिकारी किंवा सल्लागार अतिशय अपरिपक्व असल्यामुळे अशाप्रकराचं पत्र गेल्याचं माझा लक्षात येत आहे. मुख्यमंत्र्यांना सल्ला देईल, तो त्यांनी ऐकायचा असेल तर ऐकावा नाही तर ऐकू नये. अशाप्रकारचं पत्र पाठवतानात त्यांनीही खातरजमा केली पाहिजे. मुळातच कुठल्याही पक्षाचं किंवा कुणाचंही डेलिगेशन जेव्हा राज्यापालांना भेटतं, त्यावर राज्यपालांकडून एक पत्र जातं. हे डेलिगेशन मला भेटलं, या त्यांच्या मागण्या आहेत. त्यानुसार आपण कारवाई करावी. आताही जे पत्र त्यांनी दिलं त्यात सांगितलं आहे की, मला 13 आमदारांचं डेलिगेशन भेटलं. त्यांनी शक्ती कायदा लवकर व्हावा अशा प्रकारची मागणी केली आहे. शक्ती कायदा लवकर बनवावा यासाठी दोन दिवसांचं अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे आपण त्याचा विचार करावा. हा कुठलाही आदेश नाही, हा विचार व्यक्त केलाय. राज्यपालांना आदेश देण्याचा, फॉरवर्ड करण्याचा अधिकार आहे. त्यांनी तो फॉरवर्ड केलाय’, असं फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!