ठाणे : नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाचे अराजपत्रीत अधिकारी व कर्मचा-यांच्या विविध प्रलंबीत मागण्यांच्या निषेधार्थ मंळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. ठाण्यातही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अधिकारी व कर्मचा-यांकडून निदर्शने करून राज्य शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
मागील तीन ते चार वर्षापासून विविध मागण्यांसाठी नेांदणी मुद्रांक शुल्क विभागाकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र अजूनही या मागण्या मंजूर करण्यात आलेल्या नाहीत. प्रलंबित मागण्यांसाठी नेांदणी मुद्रांक व विभाग अराजपत्रीत अधिकारी व कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाचा इशारा दिला हेाता त्यानुसार मंगळवारपासून हे आंदोलन करण्यात आलं कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष डेबडे यांच्यासह राज्य कर्मचा-यांचे नेते भास्कर गव्हाळे यांच्या नेतृ़त्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. यावेळी कर्मचारी संघटनेकडून तब्ब्ल २१ मागण्या करण्यात आल्या.
काय आहेत मागण्या
१ नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व संवर्गातील रखउलेल्या पदोन्नत्या त्वरीत कराव्यात.
२ पदोन्नती कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय नवी सेवा प्रवेश नियम लागू करू नये.
३ सर्व रिक्त पदे तात्काळ भरावीत.
४ कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचा-यांच्या कुटूंबियांना ५० लाखाची मदत देणे व कुटूंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेणे.