ठाणे : ठाणे महापालिकेच्यावतीने श्री गणेश विसर्जनासाठी निर्माण करण्यात आलेल्या विसर्जन महाघाट, गणेशमुर्ती स्वीकार केंद्र व कृत्रीम तलावांमध्ये दहाव्या दिवशी एकूण ४५३६ गणेशमुर्तीचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये भक्तिमय वातावरणात विसर्जन संपन्न झाले. तर दहाव्या दिवशी २०५० नागरिकांनी डिजी ठाणेच्या ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंगद्वारे गणेशमुर्तींचे विसर्जन केले.

दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे महानगरपालिकेच्यावतीने शहरात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी व्यवस्था तयार करण्यात आली होती. यावर्षीही शहरामधील हजारो भाविकांनी आपल्या दहा दिवसांच्या गणपतीचे भक्तिमय वातावरणात विधिवत विसर्जन केले. यावर्षी दहाव्या दिवशी ४१४७ घरगुती गणेशमुर्ती, २१४ सार्वजनिक गणेश मुर्ती, १७० स्विकृत गणेश मुर्ती तसेच ५ गौरींचे असे एकूण ४५३६ मुर्त्यांचे विसर्जन करण्यात आले.

शहरातील मासुंदा व आहिल्यादेवी होळकर येथील कृत्रीम तलावामध्ये यावर्षी ४६० घरगुती गणेश व ०६ सार्वजनिक गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. खारेगाव कृत्रीम तलावात १८७ घरगुती गणेश मुर्तीं, आंबेघोसाळे येथील कृत्रीम तलावामध्ये १०६ गणेशमुर्तीं, रेवाळे कृत्रिम तलाव येथे १३५ घरगुती गणेश मुर्ती ०६ सार्वजनिक गणेश मुर्तीं, मुल्लाबाग येथे २३३ घरगुती गणेश मुर्ती, खिड़काळी तलाव येथे ७४ घरगुती गणेश मुर्ती, ०३ सार्वजनिक गणेश मुर्ती व ०५ गौरींचे, शंकर मंदीर तलाव येथे ९२ घरगुती गणेश मुर्ती व १६ सार्वजनिक गणेश मुर्ती, उपवन तलाव येथे ५७१ घरगुती गणेश मुर्ती व ३६ सार्वजनिक गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले.

पारसिक तलाव येथे बांधण्यात आलेल्या विसर्जन महाघाट येथे ४०३ घरगुती गणेश मुर्ती, ६२ सार्वजनिक गणेश मुर्ती व १७० स्वीकृत गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. गायमुख घाट १ येथे १७५ घरगुती गणेश मूर्ती, तसेच गायमुख घाट २ येथे ५८ घरगुती गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. मिठबंदर घाट येथे १३९ घरगुती गणेश मुर्ती व १७ सार्वजनिक गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर रायलादेवी घाट १ येथे ४३५ घरगुती गणेश मुर्ती, रायलादेवी घाट २ येथे २४१ घरगुती गणेश मुर्ती, कोलशेत घाट १ व २ येथे ३७८ घरगुती गणेश मुर्ती, २२ सार्वजनिक गणेश मुर्ती, आत्माराम घाट येथे २४ घरगुती गणेश मूर्ती व ०४ सार्वजनिक गणेश मुर्ती, बालाजी घाट येथे ४८ घरगुती गणेश मूर्ती व ०६ सार्वजनिक गणेश मुर्ती तसेच दिवा विसर्जन घाट येथे ३८८ घरगुती गणेश मुर्ती व ३६ सार्वजनिक गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!