कल्या : ‘मुंबईची लाईफलाईन’ म्हणून ओळखल्या जाणा-या लोकलने अवघ्या ६७ मिनिटांत कल्याणहून मुंबईच्या रूग्णालयात ब्रेन डेड झालेल्या रूग्णाचे अवयव गरजूपर्यंत पोहचले आहे.

कल्याणच्या एका खासगी रुग्णालयात असलेल्या ब्रेन डेड व्यक्तीने आपले किडनी आणि लिव्हर हे दोन्ही महत्वाचे अवयव दान केले. मुंबईच्या परळ येथील दुसऱ्या खासगी रुग्णालयात असणाऱ्या व्यक्तीला हे अवयव प्रत्यारोपण करण्यात येणार होते. मात्र रस्ते वाहतुकीला खड्डे आणि वाहतुक कोंडीचे लागलेले ग्रहण पाहता सध्या मुंबई लोकल ट्रेन हाच सर्वात जलद आणि सुरक्षित पर्याय असल्याचे दिसून आले. त्यामूळे संबंधित रुग्णालयाच्या टिमने  कल्याणहून थेट लोकलने परळ गाठून तेथील खासगी रुग्णालयात वेळेवर पोहचवण्यात आले. कल्याणातील  रुग्णालय ते मुंबईतील रुग्णालय प्रवास अवघ्या ६७ मिनिटांत पूर्ण करण्यात आला. यासाठी कल्याण आणि दादर रेल्वे स्टेशनवरील रेल्वे अधिकारी, कर्मचारी, जीआरपी, आरपीएफ स्टाफनेही विशेष काळजी घेतल्याचे दिसून आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *