कल्याण : केडीएमसी म्हणजे कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉपौरेशन अशी व्याख्या आपल्या सर्वांनाच माहित असेलच. पण मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसीची नवीन व्याख्या शोधून काढलीय. KDMC म्हणजे …..! K – Khadde ( खड्डे ) D – Dagad ( दगड ) M- Maati ( माती ) C – Chikhal ( चिखल ) असे ट्विट आमदार पाटील यांनी केलय.
.केडीएमसी आणि खड्डे हे दरवर्षी जणूकाय समीकरणंच बनलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले. अनेक रस्त्यांची अक्षरश: चाळण झालीय रस्त्यातूनच नागरिकांना वाहन चालकांना कसा बसा मार्ग काढावा लागत आहे. खड्डयांच्या समस्येवरून विरोधकांनी आंदोलन केली. बाप्पाचे आगमन आणि विसर्जनही खड्डयातूनच झाले. खड्डयांच्या समस्येवरून आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाला धारेवर धरले. पण प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सत्ताधा-यांकडून एकिकडे स्मार्ट सिटीचे चित्र रंगवले जात असतानाच दुसरीकडे खड्डयांमुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. त्यातच स्मार्ट सिटीच्या एका फलका शेजारीच पाण्याने भरलेला खड्डा, कचरा दिसून येत असल्याचा फोटो आमदार राजू पाटील यांनी ट्विट केला आहे स्मार्ट सिटीच्या विकासाचे काम प्रगतीपथावर आहे असे त्या फलकावर मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे आमदार पाटील यांनी फोटो ट्विट करीत प्रशासन आणि सत्ताधा-यांवर टीका केली आहे.