संतोष गायकवाड
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्वाचे ९ निर्णय घेण्यात आले आहेत. आगामी गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने घेतला. त्याचबरोबर राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडण्या संदर्भातील महत्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. एकूण ५ हजार कोटींचा प्रस्ताव या कामासाठी मांडण्यात आला आहे.
100 रुपयात आनंदाचा शिधा
गौरी गणपती आणि दिवाळीसाठी 100 रुपयात आनंदाचा शिधा देण्यात येणार आहे. त्यात प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल आदी साहित्य देण्यात येणार आहे. त्यावर आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आला.
कॅसिनो कायदा रद्द
राज्य सरकारने राज्यातील कॅसिनो कायदा रद्द करण्याचा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय..
* राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार.
* ५ हजार कोटींच्या प्रस्तावानुसार भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार.
*गौरी- गणपती तसेच दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा मिळणार. ज्यामध्ये प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेलाचा समावेश असेल.
आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थींना विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात आली आहे. या निर्णानुसार आता दरमहा ५०० रुपये मिळणार आहेत.
मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी देण्यात आली.
पावसाळी अधिवेशनात चर्चेत आलेला महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय.
केंद्र सरकारच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. सुधारित निर्णयात राज्याचा हिस्सा वाढला.
सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे घेण्यात आला.
दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन.
मंडणगड येथे दिवाणी न्यायालय होणार.