ठाणे :- भिवंडी, युनिट-2, गुन्हे शाखेच्या पथकाने धामनकरनाका भिवंडी येथील ‘अल्ताफ अत्तरवाला’ या दुकानावर छापा टाकुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या हुक्क्याचे वेगवेगळ्या प्रकारचे ५७ हुक्का फ्लेवरचा माल किं. रु 8940/- चा जप्त करुन नारपोली पोलीस ठाणे येथे करण्यात आला असून गुन्हे शाखा, युनिट-2, भिवंडी यांच्याकडुन करण्यात येत आहे.
भिवंडी शहर परिसरामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधीत असलेल्या हुक्क्याच्या साठ्याचा शोध घेत असतांना गोपनीय माहितीद्वारे दापोडा गाव हद्दीतील हरीहर कॉम्प्लेक्स, कृष्णा कन्स्ट्रक्शन बिल्डींग नं एफ/5, या गोडावुनच्या गाळा नं 4, 5, 6 येथे असलेल्या M/s HIGH STREET IMPEX LLP, MUMBAI या कंपनीच्या गोडावुनवर छापा कारवाई केली असता, सदर कंपनीच्या गोडावुनमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधीत असलेला निकोटीनयुक्त ‘अफजल हुक्का फ्लेवर’ एकुण बॉक्स 2862, किं. रु 8,42,49,610/- आणि ‘सोएक्स हर्बल फ्लेवर’ चे 375 बॉक्स किं. रु.94,28,910/- असा एकुण 9,36,78,520/- रु. किं. चा हुक्का फ्लेवरचा माल मिळुन आलेला असुन तो जप्त करण्यात आला आहे.
सदरचा ‘अफजल हुक्का फ्लेवर’ आणि ‘सोएक्स हर्बल हुक्का फ्लेवर’ हे दोन्ही हुक्का फ्लेवरचा माल ‘सोएक्स इंडीया प्रा. लि’, निर्मल, 21 वा माळा, नरीमन पॉईंट, मुंबई या कंपनीकडुन उत्पादन व निर्यात केला जात असून सदर उत्पादन केलेला हुक्का फ्लेवरचा माल सदर गोडावुनमधुन बेकायदेशिरपणे विक्री केला जात आहे. सदर सोएक्स इंडीया प्रा. लि. या कंपनीकडुन बनविलेला निकोटीनयुक्त ‘अफजल हुक्का फ्लेवर’ हा माल भिवंडी शहर परिसरात, ठाणे शहर परिसरात मुंबई शहर त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होत असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे.
बहुसंख्य तरुण पिढी अंमली पदार्थ, हुक्क्याचे सेवन तसेच इतर व्यसनांच्या आहारी जावुन विळख्यात सापडलेली आहे. त्यामुळे किशोरवयीन मुले / मुली, तरुण / तरुणी हे हुक्का सेवनाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होऊन सेवन करीत आहेत. हुक्क्याच्या सेवनामुळे त्यांचे आरोग्यावर घातक परिणाम होऊन काही मुले, तरुण हे गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळलेले दिसनु येत आहेत. वरीलप्रमाणे जप्त केलेल्या हुक्क्याचा मालाबाबत सखोल तपास करण्यात येत असुन बेकायदेशीर साठा केलेल्या कंपनीविरुध्द पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असून पुढील तपास गुन्हे शाखा, भिवंडी युनिट-2 हे करीत आहेत.