डोंबिवलीत साकारला ५० फूटी तोरणा किल्ला, अरूण निवास बनले डोंबिवलीचे किल्लेदार !

टिळकनगर मंडळाचा किल्ले बांधणी स्पर्धा संपन्न

डोंबिवली : महाराष्ट्राला लाभलेल्या वैभवशाली दुर्ग परंपरेचा वसा पुढे नेण्याच्या उद्देशाने आणि महाराष्ट्रात असलेल्या असंख्य किल्ल्यांची माहिती तरूण पिढीला व्हावी या उद्देशाने टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने दरवर्षी दिवाळी मध्ये किल्ले बांधणी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाच्यावर्षी ५० फूटी भव्य तोरणा किल्ला बनवणारे अरूण निवास मधील रहिवाशी हे डोंबिवलीचे किल्लेदार ठरले आहेत.

किल्ले स्पर्धेमध्ये २५ बिल्डिंगच्या तरूण गटांनी सहभाग घेतला होता. सर्व स्पर्धकांनी अतिशय मेहनत घेऊन आणि मुळ किल्ल्याची प्रतिकृती करण्यासाठी त्या किल्ल्याचे जास्तीत जास्त बारकावे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. दुर्गप्रेमी विलास वैद्य आणि ओंकार देशपांडे यांनी या सर्व किल्ल्यांचे परीक्षण केले. त्यांनी सहभागी स्पर्धकांना किल्ल्याविषयी माहिती विचारून स्पर्धकांनी किल्ला करताना त्याच्या इतिहासाचा अभ्यास केला आहे की नाही हा देखील तपासून पाहिले गेले अशी माहिती मंडळाचे प्रसिध्दीप्रमुख संदीप वैद्य यांनी दिली. महाराष्ट्राच्या वैभवशाली दुर्गपरंपरेचं जतन, किल्ल्यांच्या बांधणीबाबत, इतिहासाबाबत तरूणांनी माहिती व्हावी आणि एका इमारतीत राहणाऱ्या पण आपल्या दिनचर्येत व्यस्त असणाऱ्या नागरीकांनी थोडा वेळ काढून किल्ला बनविण्यासाठी एकत्र यावे या उद्देशाने मंडळ ह्या स्पर्धेचे आयोजन करते असे मंडळाचे प्रकल्प प्रमुख व दुर्गप्रेमी तन्मय गोखले यांनी सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करताना सांगितले. तसेच दरवर्षी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळाचे कार्यवाह केदार पाध्ये यांनी केले.

कोण ठरले मानकरी

प्रथम क्रमांक – किल्ले तोरणा, अरुण निवास, जुनी डोंबिवली, डोंबिवली (पश्चिम)
द्वितीय क्रमांक – किल्ले परांडा, बाळ गोपाळ मित्र मंडळ, मढवी शाळेजवळ, आयरे रोड, डोंबिवली(पुर्व)
तृतीय क्रमांक – किल्ले पुरंदर ,अर्जुन नगर कॉम्प्लेक्स, शेलार नाका, डोंबिवली(पूर्व)

उत्तेजनार्थ –
1) किल्ले चंदेरी, जुनी व्यायामशाळा, सत्यवान चौक, उमेश नगर, डोंबिवली (पश्चिम)
2) किल्ले माहुली, विजयस्मृती, पेंडसेनगर, डोंबिवली(पूर्व)

२ प्रोत्साहनपर पारितोषिके
1) किल्ले लोहगड- विवेकानंद सोसायटी, सारस्वत कॉलनी, डोंबिवली( पूर्व)
2) किल्ले तोरणा – पंढरीनाथ स्मृती, नामदेव पथ, डोंबिवली(पुर्व)

    किल्ले परांडा                                                                        किल्ले पुरंदर                                                                 किल्ले चंदेरी

                                           

       किल्ले माहुली                                           

                                                                   

 

 

One thought on “डोंबिवलीत साकारला ५० फूटी तोरणा किल्ला, अरूण निवास बनले डोंबिवलीचे किल्लेदार !”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!