कल्याण : कल्याणमध्ये गरबा खेळण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाच्या घरातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मिळून ३५ लाख ८८ हजाराचा मुद्देमान लंपास केल्याचे उघडकीस आले आहे.धक्कादायक बाब म्हणजे या इमारतीचा वॉचमन गगन बहादूर व त्याची पत्नी सुमन बहादूर यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने ही चोरी केल्याचे उघड झाले आहे.


कल्याण पश्चिमेतील चिकनघर परिसरातील उमा दर्शन सोसायटीमध्ये राहणारे पटेल कुटुंबीय शुक्रवारी गरबा खेळण्यासाठी शहाड पाटीदार भवन येथे गेले होते. गरबा खेळून घरी परतल्यानंतर त्यांना घरातील दागिने व रोख रक्कम चोरीला गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस तपासामध्ये याबाबत खळबळजनक माहिती समोर आली.

ज्यामध्ये या इमारतीत वॉचमन म्हणून काम करणारे गगन बहादुर व त्याची पत्नी सुमन बहादूर यांनी आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने पटेल यांच्या घरी चोरी केल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनी बेडरूममधील कपाट फोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा मिळून ३५ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तसेच हे पती-पत्नी नेपाळला पळाल्याचेही पोलीस तपासात समोर आले असून सध्या त्यांचा शोध सुरू आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *