रोटरी क्लब आणि मनसे आमदार प्रमोद (राजू )पाटील यांच्यासह कंपन्यांची मदत…

डोंबिवली : ठाणे,डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ परिसरात कोरोना बधितांचा आकडा हा झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे मनसे आमदार प्रमोद(राजू)पाटील,रोटरी इंटरनॅशनल,रोटरी क्लब ऑफ क्राऊन सिटी, रोटरी क्लब ऑफ ठाणे आणि ठाणे वेस्ट यांच्या सह योगिराज कंपनी आणि डोंबिवली मधील डॉट मंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यसेवा देणाऱ्या आवश्यक अश्या वस्तूंचा पुरवठा केला जाणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्र, केडीएमसी, उल्हासनगर, अंबरनाथ क्षेत्रातील हॉस्पिटल,दवाखाने आणि आत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना आवश्यक अश्या साहित्याचा पुरवठा केला जाणार आहे.यामध्ये ३००० कॉटन मास्क, ३००० एन ९५ मास्क, ५५०० पीपीई किट्स आणि हँड सॅनिटाईझर.वितरित करण्यात येणार आहेत.या साहित्याचे बाजार मूल्य हे ३२ लाख ५० हजार रुपये आहे.यासाठी रोटरी इंटरनॅशनची मोठी मदत आणि योगिराज, डॉट मंट या कंपन्यांनी आपले सीएसआर फंड देखील दिला आहे.यासाठी रोटरी क्लबचे मोहन चांदरकर,विक्रम कागदे,स्वप्नील गायकर, सूचित गडकरी, अच्युत दामले यांच्यासह या उपक्रमात विशेष सहकार्य हे विक्की रमेश पाटील यांनी केले आहे.सदर वस्तूंची पाहणी करण्यात आली तसेच वाटपाचे नियोजन सुद्धा करण्यात आले.यावेळी रोटरीचे डॉ.मयुरेश वारके आणि इतर मेम्बर्स उपस्थित होते.तसेच मनसे आमदार पाटील,प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम,जिल्हा संघटक हर्षद पाटील, सागर जेधे आणि उदय चेउलकर उपस्थित होते.

रोटरी इंटरनॅशनल किंवा स्थानिक  क्लब ते नेहमी मदत करत असतात.त्यामुळे मला वाटलं की त्यांची मदत मिळेल या अनुषंगाने जिल्हा गव्हर्नर याना ४ एप्रिल २०२० रोजी पत्र दिलेले आणि स्वतः देखील या कार्यात मदत केली.या कार्याची दखल ग्लोबल रोटरी क्लब ने इंटरनॅशनल फंड सुद्धा आले आहेत.त्यामधून ३२ लाखा पेक्षा अधिक किंमतीचा साहित्य आले आहे. हे साहित्य रोटरी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यसेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱयांना दिला जाणार आहे.मी माझ्या आणि माझ्या पक्षाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि अजून नागरिकांनी कंपन्यांनी या मदत कार्यात पुढे यावे.”

– प्रमोद (राजू)पाटील, मनसे आमदार.

“रोटरी क्लब आणि मनसे आमदार यांनी चांगले काम केले आहे आणि याचा नक्कीच फायदा होईल.”  – डॉ.मयुरेश वारके, रोटरी जिल्हा प्रांत पालक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!