डोंबिवली: शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या सहकार्याने व दिपेश म्हात्रे फाउंडेशन यांच्या प्रयत्नाने डोंबिवलीतील नागरिकांसाठी मोफत महा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . या शिबिरात २५०० चष्म्यांचे वाटप करण्यात आलं त्याचबरोबर ३००० नागरिकांना मोफत औषधे देण्यात आली. सुमारे तीन ते साडेतीन हजार नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिराला कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या शिबिराला भेट दिली व सदर शिबिर यशस्वी करण्याकरिता उपस्थित राहणाऱ्या सर्व डॉक्टर्स चे आभार मानले . यावेळी माजी उपमहापौर रमाकांत मढवी , उपजिल्हा प्रमुख राजेश कदम , माजी नगरसेवक रंजी जोशी , राम भोजणे , राम राऊत , आशु सिंह , स्वप्निल विटकर, परेश म्हात्रे, ओंमकार तांबे, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.