कल्याण: महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील खडवली परिसरात वीज चोरांविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. या कारवाई २६ जणांकडून विजेचा चोरटा वापर सुरू असल्याचे आढळून आले असून संबंधितांनी ३ लाख १५ हजार २९० रुपये किंमतीची २० हजार ३७५ युनिट वीज चोरुन वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. वीज चोरी कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार या सर्व जणांविरुद्ध मुरबाड पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

जयराम शंकर, भोलेनाथ तिवारी, उमेश पाटाने, नाना जंगले, विजय शुक्ला, भैरु बोंबे, विजयपाल मौर्या, गुड्डु गुप्ता, अकबर अली अन्सारी, असलम खान, दिनानाथ प्रजापती, महेश प्रजापती, ध्यानसिंग यादव, अंजनीकुमार सिंग, पंकज कनोजिया, प्रकाश कोरी, श्रीराम मौर्या, सोनमती राजभर, मुख्तार सिंग, रामशंकर गौतम, सुरज तिवारी, गीता गुप्ता, राजेश मौर्या, विकास दुबे, उज्ज्वला दासगुप्ता, राजेश पटेल (सर्व राहणार सीताबाई नगर, खडवली पूर्व, ता. कल्याण) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्वच ठिकाणी वीज मीटरला येणाऱ्या केबलला टॅपिंग करून वीज मीटर टाळून परस्पर वीजवापर होत असल्याचे आढळून आले आहे. उपविभागीय अभियंता गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे व त्यांच्या टिमने ही कारवाई केली. वीजचोरीच्या गुन्ह्यात जबर शिक्षा व दंडाची तरतूद असून कोणत्याही प्रकारे विजेचा अनधिकृत वापर करू नये, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!