डोंबिवली : स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम मशीन गॅस कटरच्या साहाय्याने चोरटे फोडत असतानाच मशीनला आग लावून ATM मधील २१ लाख ११ हजाराची रोकड जळाल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. एटीएम फोडून रोकड लंपास करण्याचा चोरट्यांचा डाव फासला आहे.

डोंबिवली पश्चिमेतील महात्मा फुलेरोडवरील साई बाबा चौकात स्टेट बँक आफ इंडियाचे एटीएम आहे. १४ जानेवारीच्या मध्यरात्री चोरट्यांनी या एटीएममध्ये प्रवेश केला. चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने मशीन फोडीत असताना गॅससमुळे मशीनला आग लागली. या आगीत एटीएम मशीनमधील २१ लाख ११ हजार ८०० रुपयांची रोकड संपूर्ण जळून खाक झाली. यानंतर चोरट्यांनी चोरी करताना तेथील सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरुन नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एटीएमचा मशीन परिचालन कर्मचारी राकेश पवार यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिस उपनिरीक्षक जी. बी. देवरे तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *