मुंबई : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आणि बेस्ट कर्मचाऱ्यांची यंदा प्रत्येकी 20 हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आलाय. एकिकडे एसटी कर्मचारी पगारासाठी आक्रमक झाले असतानाच दुसरीकडे बेस्ट कर्मचा-यांची दिवाळी गोड झालीय. गेल्या वर्षी 15 हजार 500 रुपये बोनस देण्यात आला होता.
मुंबई महापालिका तसेच बेस्ट उपक्रमाचे अधिकारी / कर्मचारी यांना दिवाळी बोनस मिळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक पार पडली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर व महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सध्या मुंबई पालिकेत एक लाखांहून अधिक कर्मचारी आणि बेस्टचे 34 हजार कर्मचारी आहे. या निर्णयामुळे दिवाळी गोड होणार आहे. कोरोना संकटामुळे पालिकेलाही आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान कोरोना परिस्थिती पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावले आहे. यामुळे यंदाच्या दिवाळी पालिकेच्या सर्व कामगार, कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला आहे.