ठाणे दि. २० :- ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील प्रकल्प बाधित होणाऱ्या नागरिकांच्या तात्पुरत्या स्वरुपात पुनर्वसनाकरता महापालिका क्षेत्रात रेंटल हौंसिग स्किम अंतर्गत सुरु असलेल्या MMRDA प्रकल्पामधील महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या इमारतीतील सदनिकांमध्ये खोटी कागदपत्रे दाखवून घुसखोरी करणाऱ्या 10 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थावर मालमत्ता विभागाचे कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर यांनी कारवाई करुन सदरच्या सदनिका सील केल्या आहेत.


मुंब्रा कौसा , शिळ येथील भारत गियर कंपनी येथे असलेल्या MMRDA च्या दोन इमारती बिल्डींग नं.एच (Grd/still+1st to 24th floors Total Flat 366) बिल्डींग नं.आय (Grd/still+1st to 24th floors Total Flat 352) या दोन इमारती ठाणे महापालिकेस MMRDA कडून सन 2018 साली हस्तांतरित करण्यात आल्या होत्या. मुंब्रा, शीळ येथील रस्तारुंदीकरण तसेच इतर प्रकल्पामधील बाधित कुटुबांना MMRDA च्या सदर इमारत क्र एच मध्ये तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतरित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आय बिल्डींग मध्ये अत्यल्प प्रमाणात प्रकल्प बाधितांना स्थलांतरीत करण्यात आले असून सदर इमारतीमध्ये उर्वरीत सदनिका रिक्त असून त्या महापालिकेच्या ताब्यात आहेत.
MMRDA चे बिल्डींग क्र. आय मधील विजय रमेश चव्हाण यांचे नावे असलेले Flat no.1212 व सुनिल हरीप्रसाद रायबोले यांचा flat no. 1704 या दोन सदनिकांची ताबा पत्र, स्थावर मालमत्ता विभागाचे कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर यांची सही असलेली ताबा पावती व बांधकाम विभागाचे सहाय्यक आयुक्त म्हणुन नितीन अवसरमल यांची स्वाक्षरी असलेले पत्र व एक भाडेकरार आदी कागदपत्रे सदर व्यक्तींनी दाखवले. मात्र यावरील दोन्ही स्वाक्षऱ्या खोट्या असल्याचे महेश आहेर, कार्यालयीन अधिक्षक, स्थावर मालमत्ता विभाग यांच्या निदर्शनास आले.

तसेच पालिका कर्मचारी अनिल बागडे हे H व I बिल्डींग येथील लिफ्ट व पाण्याच्या तक्रारीची पाहणी करण्यासाठी गेले असता, तेथे रिक्त असलेल्या महापालिकेच्या ताब्यातील सदनिकांमध्ये अनोळखी संशयास्पद व्यक्ती राहत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर महेश आहेर यांनी तातडीने स्थावर मालमत्ता विभागाचे लिपीक प्रविण वीर, तुषार जाधव, भुषण कोळी, जितेश सोलंकी व अनिल बागडे यांना पाठवून सदर इमारतीमध्ये जाऊन महापालिकेच्या ताब्यात असलेल्या रिक्त सदनिकांमध्ये पाहणी करण्यास सांगितले. महापालिकेच्या दप्तरी रिक्त असलेल्या सदनिकाची पाहणी केली असता एकुण 19 सदनिकामध्ये बनावट कागदपत्राच्या आधारे भाडेकरार करुन तसेच, इतर बोगस कागदपत्राच्या आधारे महापालिकेच्या ताब्यातील सदनिकांचा अनधिकृतरित्या वापर करत असल्याचे दिसुन आले.

त्यानंतर तातडीने कारवाई करुन सदरच्या 19 सदनिका स्थावर मालमत्ता विभागाच्या पथकाने ताब्यात घेऊन सील केले आहेत व सदर प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबत अहवाल सादर केला असता महापालिका आयुक्त बिपिन शर्मा यांनी गुन्हा दाखल करण्यास मान्यता दिली. त्यानुसार बनावट ताबा पावत्या बनवुन महापालिकेची मालमत्ता घुसखोरी करुन ताब्यात घेऊन परस्पर त्रयस्त व्यक्तींना भाड्याने देणाऱ्या विजय रमेश चव्हाण, सुनिल हरिप्रसाद रायबोलेसह 19 व्यक्तींविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी फिर्याद महेश आहेर, कार्यालयीन अधिक्षक, स्थावर मालमत्ता विभाग यांनी पोलीस ठाण्यात केल्यानुसार शीळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *