सियोल : दक्षिण कोरियामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. दक्षिण कोरियात 181 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळलं आहे. या अपघातात आतापर्यंत १७५ जणांचा मृत्यू झाला आहे. लँडिंग करताना विमान धावपट्टीवरून जाताना हा मोठा अपघात झाला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान धावपट्टीवरून उतरले. हे विमान जेजू एअरवेजचे होते. विमानात 175 प्रवासी आणि सहा फ्लाइट अटेंडंट होते.
हे विमान थायलंडहून परतत होते आणि लँडिंग दरम्यान क्रॅश झाले.विमानतळाच्या कंपाऊंडला धडकल्यानंतर विमानाला आग लागली. यानंतर विमानतळावर एकच गोंधळ उडाला.
मुआन विमानतळावर बचावकार्य सुरू आहे. जेजू एअरचे फ्लाइट क्रमांक 2216 बँकॉकहून दक्षिण कोरियाला परतत होते. विमानाला आग लागल्यानंतर आकाशात धुराचे मोठे लोट पसरले. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच मदत कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. बचाव पथकाने विमानाच्या मागील भागातून प्रवाशांना बाहेर काढले आहे. लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्याने विमानतळावर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दक्षिण कोरियाचे काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष चोई संग-मू यांनी या विमान अपघातावर शोक व्यक्त केला आहे. मुआन विमानतळावर तातडीने बचाव कार्य आणि सर्व बचाव प्रयत्न करण्याचे आदेशही त्यांनी दिले.