गुंतवणुकीवर झटपट ४० टक्क्याचे आमिष

डोंबिवली : डोंबिवलीत राहणाऱ्या एका तरूणाची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख वाढवून त्याला तात्काळ आमच्या ऑनलाईन योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 20 ते 40 टक्के तात्काळ परतावा मिळेल, असे अमिष दाखवून तरूणाने टप्प्याने एकूण १७ लाख ३३ हजार रूपयाची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत उजेडात आला आहे

आल्हाद अनिल रानडे यांची फसगत झाली असून त्याने रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

     संगणक तंत्रज्ञ असलेला हा तरूण रामनगरमधील राजाजी रोड परिसरात राहतो. या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार आल्हाद रानडे याला गेल्या वर्षी डिसेंंबरमध्ये त्याच्या मोबाईलच्या व्हाॅट्स व्हॉट्स ॲपवर एक मेसेज आला. आपणास अर्धवेळ नोकरी करायची असेल तर आपण संपर्क करू शकता असा मेसेज होता. आल्हाद याने त्या मेसेजला प्रत्युत्तर देऊन कामाबाबत विचारणा केली. त्यावेळी समोरून रितू नावाच्या महिलेने आम्ही तुम्हाला दिलेल्या ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करा, तुम्हाला तात्काळ 210 रूपये मिळतील. त्या प्रक्रिया पूर्ण केल्यावर आल्हाद याला इन्स्टाग्रामच्या माध्यमातून काही जुळण्या आल्या. त्या आल्हाद याने भरून दिल्या. त्यात आल्हाद याच्या बँक खात्यांची माहिती भरून घेण्यात आली. इनस्टाग्रामच्या 147 सदस्य असलेल्या ग्रुपमध्ये आल्हाद याला समाविष्ट करून घेण्यात आले. ग्रुपचे ऍडमीन कपील सिंग आणि एमेली सिंग यांनी आता तुम्ही जेवढी रक्कम गुंतवाल त्या रकमेचे गुगल मॅप, पंचतारांकित हाॅटेल गुणांक द्याल तेवढ्या बदल्यात तुम्हाला 20 ते 40 टक्के केलेल्या गुंतवणुकीवर आकर्षक परतावा तात्काळ मिळेल, असे आश्वासन दिले.
    

इतर सदस्य आल्हाद याला ग्रुपमधून गुंतवणुकीतून आकर्षक परतावा तात्काळ मिळत असल्याचे दाखवून देत होते. आल्हाद याला त्याचा अनुभव येत होता. कमी कालावधीत वाढीव परतावा मिळत असल्याने आल्हाद याने एचडीएफसी, ॲक्सिस, आयसीआयसीआय, फेडरल, पंजाब नॅशनल अशा 5 बँक खात्यामधून 20 हजार ते 40 हजार रूपये टप्प्याने मागील महिनाभराच्या कालावधीत भामट्यांच्या सूचनेप्रमाणे गुंतवले. एकूण 17 लाख 33 हजार रूपये भरणा केल्यानंतर आरोपी कपील आणि ऐमिली हे दोघे आल्हाद याला संरक्षित रक्कम, रक्कम परतावा व कर तपासणी नावाखाली पैसे भरण्यास सांगत होते. एवढी रक्कम आपणाकडे नाही असे आल्हाद याने कळविताच आरोपींनी बँक खात्यामधील रक्कम आल्हाद याच्या खात्यात पाठविल्या. त्या रकमांचा तक्रारदाराने वापर करून आरोपींनी दिलेल्या प्रक्रिया पूर्ण केल्या. आता आपली रक्कम परत मिळाली पाहिजे या प्रयत्नात आल्हाद होता. रक्कम परत हवी असेल तर आणखी रकमा भरणा करा, असा आग्रह कपील आणि एमिली यांनी धरला. ही रक्कम भरणा केली नाही तर तुमची रक्कम परत मिळणार नाही, असे सांगून आल्हाद रानडे याला भामट्यांनी प्रतिसाद देणे बंद केले. त्याला व्हॉट्स ॲप ग्रुपमधून बाहेर काढले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर आल्हाद रानडे याने रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ब्रेकिंग न्यूज

error: Content is protected !!